Posts

Showing posts from 2016

माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन सदैव तत्पर - जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी

Image
·         जिल्हास्तरीय माजी सैनिक, विधवा मेळावा ·         ध्वजदिन निधी संकलनबद्दल सीईओ पाटील यांचा सत्कार वाशिम , दि . ३० :   देशाची सेवा करून परत आलेल्या माजी सैनिकांना सर्वसामान्य नागरी जीवनात येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन सदैव तत्पर असल्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज नियोजित सैनिक संकुलाच्या जागेवर आयोजित जिल्हास्तरीय माजी सैनिक, विधवा यांच्या मेळाव्यात सांगितले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त कर्नल आर. आर. जाधव, सैन्यामध्ये कर्नल पदापर्यंत पोहचून निवृत्त झालेले वाशिम जिल्ह्यातील निवृत्त कर्नल प्रवीण ठाकरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. सर्वप्रथम दीपप्रज्ज्वलन व शहीद स्मारक स्मृती चिन्हाला पुष्पहार अर्पण करून मेळाव्याला सुरुवात झाली. ध्वजदिन निधी संकलनात जिल्हा परिषदेने १२५ टक्के उद्दिष्ट्य पूर्ण केल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांचा यावेळी शहीद स्मृतिचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. तसेच शहीद सैनिक विधवा व विशेष प्राविण्य मिळविलेल्या माजी सैनिक पाल्यांचाही या

‘डिजिटल पेमेंट’च्या पर्यायाचा अवलंब करण्याची गरज

Image
·         रोखरहित व्यवहाराचे अनेक मार्ग उपलब्ध ·        ‘मोबाईल बँकिंग’साठी स्मार्टफोनची गरज नाही ·        विविध कार्ड्स, स्मार्टफोनच्या सहाय्याने व्यवहार शक्य देशातील काळा पैसा व भ्रष्टाचाराचे निर्मुलन करण्यासाठी सर्वांनी ऑनलाईन किंवा मोबाईल बँकिंगद्वारे व्यवहार करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व भारतीयांना नुकतेच केले आहे. काळा पैसा व भ्रष्टाचाराला पायबंद घालण्यासाठी ‘डिजिटल पेमेंट’ ही संकल्पना फायदेशीर ठरणारी आहे. तसेच ‘डिजिटल पेमेंट’चे अनेक पर्याय उपलब्ध असल्याने व ही संकल्पना अतिशय सोपी असल्याने सर्वसामन्य नागरिकांनाही याचा वापर करणे सहज शक्य होणार आहे. बँकांमार्फत देण्यात येणारे विविध कार्ड, मोबाईल बँकिंग, एईपीएस, मिक्रो एटीएम, युपीआय, वॉलेटस, पीओएस प्रणालीद्वारे रोखरहित व्यवहार करून ‘डिजिटल पेमेंट’चा पर्याय सर्वांना वापरता येणे शक्य आहे. या सर्व पर्यायांचा वापर कसा करता येईल, याची माहिती पुढील प्रमाणे आहे. बँक कार्ड्स- बँकेमार्फत ग्राहकांना प्रीपेड कार्ड, डेबिट कार्ड व क्रेडीट कार्ड अशी तीन प्रकारची कार्ड दिली जातात. या बँक कार्ड्सच्या माध्यमातून व

स्पर्धात्मक परीक्षेकरिता विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांचा पुढाकार

Image
·         जवाहर नवोदय विद्यालयात घेतला वर्ग ·         विद्यार्थ्यांना ‘जेईई’ पूर्व तयारीबाबत मार्गदर्शन वाशिम , दि . २६ –   ग्रामीण भागातून येऊन जवाहर नवोदय विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनीही ‘जेईई’सारख्या स्पर्धात्मक परीक्षेमध्ये सहभागी होऊन यश प्राप्त करावे, याकरिता जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी पुढाकार घेतला आहे. जिल्हाधिकारी द्विवेदी हे स्वतः आयआयटीचे विद्यार्थी असल्याने जवाहर नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांना त्यांचे मार्गदर्शनाचा लाभदायक ठरत आहे. गेल्या काही दिवसांपासून कार्यालयीन कामकाजातून वेळ मिळेल तेव्हा, शासकीय सुट्टीच्या दिवशी जिल्हाधिकारी द्विवेदी हे जवाहर नवोदय विद्यालयातील १२ वीच्या वर्गामधील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. ‘जेईई’सारख्या स्पर्धात्मक परीक्षेला सामोरे जाण्यासाठी काय तयारी केली पाहिजे, हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना समजावे हा त्यामागील मुख्य उद्देश आहे. स्वतः जिल्हाधिकारी शिक्षक बनून मार्गदर्शन करत असल्याने तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधत असल्याने विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळत आहे. आजही जिल्हाधिकारी द्विवेदी

भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे जिल्हाधिकारी कार्यालयात सामुहिक वाचन

Image
वाशिम , दि . २५ –   दिनांक २६ नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन केले. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी, श्री. डाखोरे, जिल्हा प्रशासन अधिकारी दीपक मोरे, अधीक्षक श्री. गिरी, विधी अधिकारी महेश महामुने, जिल्हा सूचना व व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बालासाहेब बोराडे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

डाव्या हाताच्या बोटास शाई असल्यास मतदानाकरिता तहसीलदारांची परवानगी आवश्यक - विभागीय आयुक्त जे. पी. गुप्ता

Image
·         दिनांक २६ नोव्हेंबरपर्यंत घेता येईल परवानगी ·         उजव्या हातास शाई असल्यास परवानगीची गरज नाही वाशिम , दि . २२ : जुन्या पाचशे रुपये व एक हजार रुपयांच्या नोटा बदलून देत असताना जिल्ह्यातील काही बँकांमध्ये ग्राहकांच्या बोटांना शाई लावण्यात आली आहे. यामध्ये नजरचुकीने डाव्या हाताच्या बोटाला शाई लावली गेली असल्यास अशा व्यक्तीला नगरपरिषद निवडणुकीत मतदान करण्यासाठी तहसीलदारांचे ना हरकत अथवा परवानगी पत्र घेणे आवश्यक असल्याचे विभागीय आयुक्त जे. पी. गुप्ता यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या नगरपरिषद निवडणूक आढावा बैठकीत सांगितले. याप्रसंगी जिल्हा निवणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, निवडणूक निरीक्षक तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रकाश पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल खंडागळे यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी व इतर संबंधित विभागांचे प्रमुख उपस्थित होते. विभागीय आयुक्त श्री. गुप्ता म्हणाले की

खादी कपड्यांचा वापर वाढविण्यासाठी प्रयत्न करा - विभागीय आयुक्त जे. पी. गुप्ता

Image
·         जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दालन सुरु ·         गुरुवारपर्यंत खादी वस्त्र खरेदीची संधी वाशिम , दि . 22 : खादी कपडे तयार करणाऱ्या कारागिरांना रोजगार मिळावा, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खादी कापडांचा सर्वांनी वापर करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार खादी कपड्यांची खरेदी करून खादीचा वापर वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे अमरावतीचे विभागीय आयुक्त जे. पी. गुप्ता यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सुरु करण्यात आलेल्या खादी वस्त्र विक्री दालनाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, भूसंपादन अधिकारी प्रकाश पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल खंडागळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी के. एम. अहमद, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस. पी. वानखेडे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी विभागीय आयुक्त श्री. गुप्ता यांनी फीत दालनाची फीत कापल्यानंतर स्वतः खादी श

वाशिम जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यान्वित

Image
·         आता जिल्हास्तरावर मिळणार जात पडताळणी प्रमाणपत्र वाशिम , दि . २१ : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने जिल्हास्तरावर जात प्रमाणपत्र समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आजपासून वाशिम येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे वाशिम जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे कार्यालय सुरु झाले. समिती कार्यालयाचे उदघाटन समितीचे अध्यक्ष आय. एम. तिटकारे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपायुक्त तथा समितीचे सदस्य बी. डी. खंडाते, समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त तथा समितीच्या सदस्य सचिव माया केदार, विशेष निरीक्षक श्री. मुसळे आदी उपस्थित होते. श्री. तिटकारे यांच्या हस्ते फीत कापून जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या नागरी सुविधा केंद्राचे उदघाटन झाले. याप्रसंगी श्री. तिटकारे म्हणाले, लोकांच्या सोयीसाठी जिल्हास्तरावर जात प्रमाणपत्र पडताळणी समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार आजपासून वाशिम जिल्ह्यात ही समिती कार्यान्वयित झाली असून समितीचे दैनदिन कामकाज आता वाशिममध्ये चालणार आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी

नगरपरिषद निवडणूक क्षेत्रात कलम १४४ लागू

वाशिम , दि . १८ : जिल्ह्यातील वाशिम, मंगरूळपीर व कारंजा या तीन नगरपरिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. या आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी तीनही नगरपरिषद निवडणूक क्षेत्रात दिनांक २९ नोव्हेंबर २०१६ पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले आहेत. प्रतिबंधात्मक आदेशात म्हटले आहे की, रात्री १० वा. नंतर राजकीय पक्षांनी सभा घेऊ नयेत. धार्मिक स्थळांचा निवडणुकीच्या प्रचाराकरिता उपयोग करू नये. आचारसंहितेच्या संपूर्ण काळात सार्वजनिक ठिकाणी शास्त्र जवळ बाळगता येणार नाही. सभे दरम्यान, मतदानादिवशी मतदान केंद्राचे ठिकाणी शस्त्र जवळ बाळगता येणार नाही. मतदानाचे दिवशी मतदान केंद्राचे ठिकाणी १०० मीटर परिसरात अनधिकृत लोकांना प्रवेश करता येणार नाही. राजकीय व कोणत्याही नागरिकांच्या अधिकाराचे हनन होणार नाही. ईव्हीएम मशीन गार्ड पासून १०० मीटर परिघात अनधिकृत लोक प्रवेश करणार नाहीत, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. हे आदेश दिनांक १८ नोव्हेंबर २०१६ रोजी सकाळी ८ वाजेपासून ते दिनांक

जिल्ह्यात १ डिसेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

वाशिम , दि . १८ : दिनांक १७ ऑक्टोंबर २०१६ पासून नगर परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. तसेच दिनांक २७ नोव्हेंबर २०१६ रोजी मतदान व दिनांक २८ नोव्हेंबर २०१६ रोजी मतमोजणी होणार आहे. या काळात कायदा व सुव्यवस्था कायम रहावी, याकरिता दिनांक १७ नोव्हेंबर २०१६ ते १ डिसेंबर २०१६ या कालवधीत कलम ३७ (१)(३) नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. या कालावधीत शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येतील अशी शस्त्रे अथवा तीक्ष्ण वस्तू जवळ बाळगणे, दाहक किंवा स्फोटक पदार्थ वाहून नेणे, दगड किंवा क्षेपणास्त्रे सोडायची किंवा फेकायची साधने जवळ बाळगणे, व्यक्तीचे प्रेत अथवा मनुष्याकृती प्रतिमा यांचे बीभत्स प्रदर्शन करणे, जाहीरपणे प्रक्षोभक घोषणा, भाषणे करणे किंवा सुरक्षितता धोक्यात येईल अशी कृती करण्यास मनाई करण्यात आली आहे. अंत्ययात्रा, धार्मिकविधी, सामाजिक सण, लग्न सोहळे यांना हा आदेश लागू नाही, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे. *****

नगरपरिषद निवडणुकांमध्ये आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करणार - जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी

Image
·         पूर्व तयारीच्या अनुषंगाने पत्रकारांशी संवाद ·         निवडणूक सनियंत्रण समिती स्थापन होणार ·         नोडल अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या वाशिम , दि . १९ : जिल्ह्यातील तीन नगरपरिषदांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून त्यासाठी दिनांक १७ ऑक्टोंबर २०१६ पासून आचारसंहिता लागू झाली आहे. जिल्ह्यातील तीनही नगरपरिषद क्षेत्रात या आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असून यासाठी निवडणूक सनियंत्रण समिती स्थापन करण्यासह इतर उपाययोजना करणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले. याप्रसंगी वाशिमचे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संदीपान सानप व मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गणेश शेटे, नगरपालिका प्रशासन विभागाचे श्याम जोशी उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले की, जिल्ह्यातील वाशिम, कारंजा व मंगरूळपीर या तीन नगरपरिषदांसाठी २७ नोव्हेंबर २०१६ रोजी मतदान होणार आहे. याकरिता दिनांक २४ ते २९ ऑक्टोंबर २०१६ या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणा

मतदार यादीत नाव नोंदविणे ही प्रत्येकाची जबाबदारी - जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी

Image
·         शासकीय विभाग प्रमुखांची बैठक ·         पदवीधर मतदार यादीत नाव नोंदणीचा आढावा वाशिम , दि . १७ :   मतदार यादीमध्ये नाव नोंदविणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. सध्या सुरु असलेल्या पदवीधर मतदार नाव नोंदणी अंतर्गत सर्व शासकीय विभाग प्रमुखांनी आपल्या अधिनस्त अधिकारी व कर्मचारी यांचे पदवीधर मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्यास प्राधान्य द्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य सभागृहात झालेल्या सर्व शासकीय विभाग प्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी पी. एस. पाटील यांच्यासह सर्व शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, भारत निवडणूक आयोग यांच्या निर्णयानुसार यापूर्वीची पदवीधर मतदार यादी रद्द करण्यात आली आहे. नवीन मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्यासाठी दिनांक ५ नोव्हेंबर २०१६ पर्यंत नाव नोंदणी मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये जिल्ह्यातील सर्व पदवीधर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचे नाव नोंदणी करण्याबाबत यापूर्वीच सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानु

लोकसहभागातून जलसंवर्धन चळवळ वाढविण्याची गरज -जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी

Image
·         जलयुक्त शिवार अभियान विषयक बैठक ·         जलसंवर्धन विषयक काम करणाऱ्या मान्यवरांचा सहभाग वाशिम , दि . १६ :   दुष्काळाचे संकट दूर करण्यासाठी राज्य शासन जलयुक्त शिवार अभियान राबवीत आहे. यामाध्यमातून जलसंवर्धनासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र लोकसहभागातून व श्रमदानातून ही चळवळ वाढविण्याचा प्रयत्न असून याकरिता जिल्ह्यातील जास्तीत जास्त गावांमधील नागरिकांनी पुढे यावे, असे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी म्हणाले. जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबविण्याबाबत जलसंवर्धन विषयक काम करणाऱ्या मान्यवरांसोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी म्हणाले की, कोणत्याही कामामध्ये लोकसहभाग मिळाल्याशिवाय ते काम यशस्वी होत नाही. त्यामुळे जलसंवर्धन चळवळीला शाश्वत स्वरूप द्यायचे असेल, तर त्यामध्ये लोकसहभाग वाढणे आवश्यक आहे. लोकांनी आपले गाव जलयुक्त करण्यासाठी सकारात्मक विचारांसह पुढे यावे. श्रमदानाच्या माध्यमातून गावांमध्ये जलसंधारणाची कामे सुरु करावीत. अशा कामांना प्रशासनाकडून आवश्यकतेनुसार सहकार्य केले जाईल. आपल्या गावासाठी पाणी उपलब्ध करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाह

पदवीधर मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करण्याचे आवाहन

वाशिम , दि . १५ : भारत निवडणूक आयोगाने दिनांक १ नोव्हेंबर २०१६ या अर्हता दिनांकावर आधारित अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतदार यादीमध्ये नोंदणी कार्यक्रम घोषित केला आहे. यापूर्वी नोंदणी करण्यात आलेली जुनी सर्व नोंदणी व मतदार याद्या रद्द झाल्यामुळे सर्व पदवीधरांची नव्याने नोंदणी करण्यात येत आहे. तरी अद्याप नाव नोंदणी न केलेल्या पदवीधारकांनी आपले नाव मतदार यादीमध्ये नोंदविण्याचे आवाहन विभागीय आयुक्त तथा अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाचे नाव नोंदणी अधिकारी जे. पी. गुप्ता यांनी केले असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. पदवीधर मतदार यादीमध्ये नाव नोंदणी नमुना १८ द्वारे दिनांक ५ नोव्हेंबर २०१६ पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.  दिनांक १९ नोव्हेंबर २०१६ पर्यंत हस्तलिखीत तयार करणे व प्रारूप मतदार याद्यांची छपाई, दिनांक २३ नोव्हेंबर २०१६ रोजी प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी, दिनांक २३ नोव्हेंबर २०१६ ते दिनांक ८ डिसेंबर २०१६ या कालावधीत दावे व हरकती स्वीकारणे , दावे व हरकती निकाली काढण्याचा दिनांक व पुरवणी यादी तयार करणे व छपाई करणे दिनांक २६ डिसेंबर २०१६ असून दि

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वाशिम येथे २३५ कोटी रुपयांच्या विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन

Image
·         वाशिम जिल्हा समृद्ध करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही ·         बॅरेजमधून उपसा सिंचन, कृषिपंपांसाठी ११४ कोटी रुपये ·         दोन वर्षात ११ हजार गावे दुष्काळमुक्त होणार ·         सोयाबीन आधारित प्रक्रिया उद्योग उभारण्यात येणार वाशिम , दि . ०७ : वाशिम जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या २३५ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा लोकार्पण व भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज वाशिम येथे संपन्न झाले. पाटणी कमर्शियल कॉम्प्लेक्स येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट, जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील, ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार, जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदाताई देशमुख, खासदार संजय धोत्रे, आमदार सर्वश्री गोपीकिशन बाजोरिया, लखन मलिक, राजेंद्र पाटणी, अमित झनक, गोवर्धन शर्मा, रणजीत सावरकर, सुनील देशमुख, संजय रायमुलकर, वाशिमच्या नगराध्यक्ष लताताई उलेमाले, कारंजाच्या नगराध्यक्ष निश