जिल्ह्यात १ डिसेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू
वाशिम, दि. १८ : दिनांक १७ ऑक्टोंबर २०१६ पासून नगर परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली
आहे. तसेच दिनांक २७ नोव्हेंबर २०१६ रोजी मतदान व दिनांक २८ नोव्हेंबर २०१६ रोजी
मतमोजणी होणार आहे. या काळात कायदा व सुव्यवस्था कायम रहावी, याकरिता दिनांक १७
नोव्हेंबर २०१६ ते १ डिसेंबर २०१६ या कालवधीत कलम ३७ (१)(३) नुसार प्रतिबंधात्मक
आदेश लागू करण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रसिद्धीस दिलेल्या
पत्रकात म्हटले आहे.
या कालावधीत शारीरिक इजा
करण्यासाठी वापरता येतील अशी शस्त्रे अथवा तीक्ष्ण वस्तू जवळ बाळगणे, दाहक किंवा
स्फोटक पदार्थ वाहून नेणे, दगड किंवा क्षेपणास्त्रे सोडायची किंवा फेकायची साधने
जवळ बाळगणे, व्यक्तीचे प्रेत अथवा मनुष्याकृती प्रतिमा यांचे बीभत्स प्रदर्शन
करणे, जाहीरपणे प्रक्षोभक घोषणा, भाषणे करणे किंवा सुरक्षितता धोक्यात येईल अशी
कृती करण्यास मनाई करण्यात आली आहे. अंत्ययात्रा, धार्मिकविधी, सामाजिक सण, लग्न
सोहळे यांना हा आदेश लागू नाही, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.
*****
Comments
Post a Comment