स्पर्धात्मक परीक्षेकरिता विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांचा पुढाकार




·        जवाहर नवोदय विद्यालयात घेतला वर्ग
·        विद्यार्थ्यांना ‘जेईई’ पूर्व तयारीबाबत मार्गदर्शन
वाशिम, दि. २६   ग्रामीण भागातून येऊन जवाहर नवोदय विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनीही ‘जेईई’सारख्या स्पर्धात्मक परीक्षेमध्ये सहभागी होऊन यश प्राप्त करावे, याकरिता जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी पुढाकार घेतला आहे. जिल्हाधिकारी द्विवेदी हे स्वतः आयआयटीचे विद्यार्थी असल्याने जवाहर नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांना त्यांचे मार्गदर्शनाचा लाभदायक ठरत आहे.
गेल्या काही दिवसांपासून कार्यालयीन कामकाजातून वेळ मिळेल तेव्हा, शासकीय सुट्टीच्या दिवशी जिल्हाधिकारी द्विवेदी हे जवाहर नवोदय विद्यालयातील १२ वीच्या वर्गामधील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. ‘जेईई’सारख्या स्पर्धात्मक परीक्षेला सामोरे जाण्यासाठी काय तयारी केली पाहिजे, हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना समजावे हा त्यामागील मुख्य उद्देश आहे. स्वतः जिल्हाधिकारी शिक्षक बनून मार्गदर्शन करत असल्याने तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधत असल्याने विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळत आहे. आजही जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी जवाहर नवोदय विद्यालयातील १२ वीच्या वर्गावर लेक्चर घेतले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मॅथेमॅटिक्स व फिजिक्स विषयाच्या अनुषंगाने करावयाची पूर्वतयारी याबाबत मार्गदर्शन केले, तसेच मुलांशी संवाद साधून त्यांच्या शंकांचे निरसन केले. जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे विद्यार्थ्यांमध्येही उत्साह संचारला असल्याचे जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य आर. एस. चंदनशिव यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे