नगरपरिषद निवडणूक क्षेत्रात कलम १४४ लागू
वाशिम, दि. १८ : जिल्ह्यातील वाशिम, मंगरूळपीर व कारंजा या तीन नगरपरिषद निवडणुकीची
आचारसंहिता लागू झाली आहे. या आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी तीनही
नगरपरिषद निवडणूक क्षेत्रात दिनांक २९ नोव्हेंबर २०१६ पर्यंत फौजदारी प्रक्रिया
संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्याचे आदेश
जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले आहेत.
प्रतिबंधात्मक आदेशात
म्हटले आहे की, रात्री १० वा. नंतर राजकीय पक्षांनी सभा घेऊ नयेत. धार्मिक
स्थळांचा निवडणुकीच्या प्रचाराकरिता उपयोग करू नये. आचारसंहितेच्या संपूर्ण काळात
सार्वजनिक ठिकाणी शास्त्र जवळ बाळगता येणार नाही. सभे दरम्यान, मतदानादिवशी मतदान
केंद्राचे ठिकाणी शस्त्र जवळ बाळगता येणार नाही. मतदानाचे दिवशी मतदान केंद्राचे
ठिकाणी १०० मीटर परिसरात अनधिकृत लोकांना प्रवेश करता येणार नाही. राजकीय व
कोणत्याही नागरिकांच्या अधिकाराचे हनन होणार नाही. ईव्हीएम मशीन गार्ड पासून १००
मीटर परिघात अनधिकृत लोक प्रवेश करणार नाहीत, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. हे
आदेश दिनांक १८ नोव्हेंबर २०१६ रोजी सकाळी ८ वाजेपासून ते दिनांक २९ नोव्हेंबर
२०१६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहणार आहेत.
Comments
Post a Comment