भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे जिल्हाधिकारी कार्यालयात सामुहिक वाचन




वाशिम, दि. २५   दिनांक २६ नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन केले.
याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी, श्री. डाखोरे, जिल्हा प्रशासन अधिकारी दीपक मोरे, अधीक्षक श्री. गिरी, विधी अधिकारी महेश महामुने, जिल्हा सूचना व व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बालासाहेब बोराडे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे