जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

 



जिल्हा रुग्णालयात

पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

वाशिम, दि. 01 (जिमाका) : 21 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या कालावधीत साजरा करण्यात येणाऱ्या जागतिक पुरुष नसबंदी पंधरवाडा निमित्ताने आज 1 डिसेंबर रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. धर्मपाल खेळकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. डॉ. अविनाश झरे आणि डॉ. अनिल कावरखे यांनी दोन रुग्णांची पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया करुन हा पंधरवाडा साजरा केले. यावेळी अतिरीक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. यादव, डॉ. अविनाश झरे, डॉ. अनिल कावरखे, डॉ. दुगाने, डॉ. जाधव, डॉ. हेबांडे, डॉ. शेख, डॉ. गुंजकर तसेच बाहयसंपर्क वैद्यकीय अधिकारी डॉ. हेडाऊ, डॉ. राठोड यांची उपस्थिती होती.

पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया कार्यक्रमात मान्यवरांनी पुरुष नसबंदीबाबत मार्गदर्शन केले. पुरुष नसबंदी पंधरवाडयामध्ये सहायक पोलीस उपनिरीक्षक अनिल पवार, निलेश गागेराव यांनी पुरुष नसबंदी शस्त्रक्रीया केली. तसेच समाजातील इतर पुरुषांनी स्वेच्छेने नसबंदीसाठी पुढाकार घ्यावा. असे आवाहन यावेळी केले. कार्यक्रमाला जयश्री भालेराव, मिना संगेवार, ॲड. राधा नरवलिया, ललिता घुगे, श्रीमती झोड, नितीन व्यवहारे, श्री. डहाळे, श्रीमती धात्रक, श्री. गायकवाड, श्रीमती डाखोरे, श्रीमती पाईकराव, श्रीमती कसारे, श्री. इंगोले, संदेश डहाळे, प्रगती मासोतकर यांची उपस्थिती होती.

*******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश