31 डिसेंबरपर्यंत हयातीचे प्रमाणपत्र सादर करावे
31
डिसेंबरपर्यंत हयातीचे प्रमाणपत्र सादर करावे
वाशिम, दि. 10
(जिमाका) : जिल्हयातील सर्व शासकीय निवृत्तीवेतन धारक हे दरवर्षी माहे नोव्हेंबरमध्ये
हयातीचे दाखले सादर करतात. 9 डिसेंबर 2021 च्या शासन परिपत्रकानूसार कोविड-19 चा
प्रादुर्भाव विचारात घेता राज्य शासकीय निवृत्ती वेतन धारकांना हयातीचा दाखला सादर
करण्यास 31 डिसेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. हा दाखला जीवन
पोर्टलमार्फत, पुर्वीप्रमाणे बँकेमार्फत, प्रत्यक्ष कोषागारात जावून किंवा
पोस्टाने सुध्दा हयातीचा दाखला पाठविता येईल. तरी निवृत्तीवेतन धारकांनी वरील
पध्दतीचा अवलंब करुन हयातीचा दाखला 31 डिसेंबर 2021 पूर्वी कोषागारास सादर करावा.
असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी चंद्रकांत खारोडे यांनी केले आहे.
*******
Comments
Post a Comment