3 जानेवारीला रोजगार कार्ड नोंदणी व कौशल्य विकास मार्गदर्शन सत्र
3
जानेवारीला रोजगार कार्ड नोंदणी व
कौशल्य विकास
मार्गदर्शन सत्र
वाशिम दि.28 (जिमाका) : आजच्या
स्पर्धेच्या युगात उद्योजकतेचा विकास व रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी
रोजगाराच्या प्रतिक्षेत असणाऱ्या युवा वर्गासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व
उद्योजकता मार्गदर्शन केंद्र वाशिमच्या वतीने 3 जानेवारी 2022 रोजी वाशिम येथील
राजस्थान आर्य कला महाविद्यालय येथे रोजगार कार्ड नोंदणी व कौशल्य विकास
मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या सत्रामध्ये जिल्हा कौशल्य विकास
रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत शासकीय रोजगार कार्डाची नोंदणी कशी
करावी, त्यासाठी आवश्यक कागदपत्रे, कार्ड निर्मितीची ऑनलाईन सुविधा तसेच अण्णासाहेब
पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या स्वयंरोजगार कर्ज योजनेसह इतर शासकीय
योजनांची माहिती देण्यात येणार आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह रोजगारासाठी
प्रयत्नशील असलेल्या अन्य इच्छुक युवक-युवतींनी या उपक्रमात सहभागी व्हावे. रोजगार
कार्डची नोंदणी या सत्रात विनामुल्य करुन दिली जाईल. असे कौशल्य विकास विभागाच्या
सहाय्यक आयुक्त श्रीमती सुनंदा बजाज यांनी कळविले आहे.
*******
Comments
Post a Comment