खरीप पिकांची अंतिम पैसेवारी जाहीर जिल्ह्याची एकूण पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी
खरीप पिकांची अंतिम पैसेवारी जाहीर
जिल्ह्याची
एकूण पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी
वाशिम, दि.
31(जिमाका) : जिल्ह्याच्या
सन २०२१-२२ या वर्षातील खरीप हंगामातील प्रमुख पिकांची अंतिम पैसेवारीच्या प्रस्तावास
मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण ७९३ महसुली गावे असून या ७९३ महसुली
गावांची खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असल्याचे जिल्हाधिकारी
षण्मुगराजन एस.यांनी कळविले आहे.
वाशिम तालुक्यात लागवडी योग्य
असलेल्या गावांची संख्या १३१ असून या सर्व गावांची अंतिम पैसेवारी ४८ पैसे आहे.
मालेगाव तालुक्यातील १२२ गावांची अंतिम पैसेवारी ४७ पैसे, रिसोड तालुक्यातील १००
गावांची अंतिम पैसेवारी ४७ पैसे, मंगरुळपीर तालुक्यातील १३७ गावांची अंतिम
पैसेवारी ४८ पैसे, कारंजा तालुक्यातील १६७ गावांची अंतिम पैसेवारी ४८ पैसे आणि
मानोरा तालुक्यातील १३६ गावांची अंतिम पैसेवारी ४८ पैसे इतकी आहे.
*******
Comments
Post a Comment