जागतिक मृदा दिवस साजरा

 



जागतिक मृदा दिवस साजरा

वाशिम, दि. 06 (जिमाका) :  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय वाशिम यांच्यावतीने वाशिम येथे जागतिक मृदा दिवस साजरा करण्यात आला. प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी उपसंचालक निलेश ठोंबरे, जिल्हा मृदा चाचणी व चिकित्सा अधिकारी श्रीधर वानखेडे व कृषी तंत्र अधिकारी दिलीप कंकाळ यांची उपस्थिती होती.

श्री. ठोंबरे यांनी जमिन क्षारीकरण थांबवा, मातीची उत्पादकता वाढवा या मोहिमेचा उद्देश सांगीतला. माती व्यवस्थापनातील वाढत्या आव्हानांना तोंड देवून मृदा क्षारीकरणाशी लढा व शाश्वतता आणि मानवी कल्याण राखण्याच्या महत्वाबद्दल जागृती वाढविणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगीतले. तसेच त्यांनी क्षार प्रभावीत मातीचा मातीच्या कार्यावर गंभीर परिणाम होतो. जसे की, कृषी उत्पादकता, पाण्याची गुणवत्ता, मातीची जैवविविधता कमी होते आणि मातीची धुप वाढते, पिकांची पाणी घेण्याची क्षमता आणि सुक्ष्म अन्न द्रव्यांची उपलब्धता कमी होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात कंपोष्ट किंवा हिरवळीच्या खताव्दारे सेंद्रीय पदार्थ वाढवावे, बांध बंदिस्ती करुन जमीनीचा उतार कमी करावा. उताराला आडवी पेरणी करावी. पीक फेरपालट करतांना कडधान्य व क्षार सहनशिल पीकांना प्राधान्य दयावे. जिप्समचा वापर वाढवावा तसेच जमीनीतील जैवकर्बाचे प्रमाण वाढविण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पांतर्गत शुन्य मशागत योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन श्री. ठोंबरे यांनी यावेळी केले.

श्री. वानखेडे यांनी मातीचा नमुना काढून तसेच माती परिक्षणाचे महत्व, जमीनीच्या उत्पादकतेचा निर्देशांक याविषयी सखोल मार्गदर्शन केले. श्री. कंकाळ यांनी शेतीची उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टिने जमीनीचे आरोग्‍य सांभाळून भविष्यातील शेती पध्दतीबाबत माहिती दिली.

कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी अनिल कंकाळ, कृषी अधिकारी प्रकाश कोल्हे, उमेश राठोड, भागव किंगर व भाजीपाला व शेंद्रीय उत्पादक गट मानोरा, कृषी महाविद्यालयाचे प्रा. शशिकांत वाकुडकर तसेच आमखेडा येथील कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. प्रास्ताविक विजय ढवळे यांनी केले. संचालन तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जयप्रकाश लव्हाळे यांनी तर उपस्थितांचे आभार कृषी अधिकारी प्रकाश कोल्हे यांनी मानले. यावेळी कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आला.   

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश