जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेकडून नवोपक्रमशील शिक्षकांचा सन्मान
जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेकडून
नवोपक्रमशील
शिक्षकांचा सन्मान
वाशिम, दि. 22 (जिमाका) : महाराष्ट्र
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणेच्या संशोधन विभागामार्फत दरवर्षी
राज्यातील काहीतरी नवे करु इच्छिणाऱ्या शिक्षक व शिक्षण यंत्रणेतील घटकांच्या
विद्यार्थीकेंद्री सर्जनशील कृतीना व्यासपीठ मिळवून त्याचा फायदा शिक्षकांना
अध्ययन, अध्यापनासाठी व्हावा, या हेतून नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या
स्पर्धेचे स्वरुप जिल्हा व राज्यस्तर असते.
21 डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय
नवोपक्रम स्पर्धा 2021-22 जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, वाशिम येथे पार पडली.
जिल्हाभरातून प्राप्त नवोपक्रमांचे तज्ञ समितीकडून अवलोकन व पडताळणी करण्यात आली. उत्कृष्ट
अशा प्राथमिक व माध्यमिक गटातील एकूण 8 नवोपक्रमशील शिक्षकांना प्रत्यक्ष
सादरीकरणाची संधी देण्यात आली. सर्व सहभागी शिक्षकांनी तज्ञ समितीसमोर उपक्रमांचे
सादरीकरण केले. प्रथम क्रमांक मानोरा तालुक्यातील कासारखेडा येथील जिल्हा परिषद
शाळेचे शिक्षक श्री. रणजीत जाधव, वाशिम तालुक्यातील वारला येथील जिल्हा परिषदेतील
शिक्षिका आरती गंगावणे आणि कोकलगांव येथील
जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका मिना नागराळे यांना तर उत्तेजनार्थ पारितोषिक
कारंजा तालुक्यातील कामरगांव येथील जिल्हा परिषदेतील शिक्षिका नीता तोडकर, कारंजा
येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक मुरलीधर जाधव यांना विभागून देण्यात आले.
माध्यमिक, उच्च माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक रिसोड तालुक्यातील भर जहाँगीर येथील श्री शिवाजी विद्यालयाचे शिक्षक संजय
धांडे यांनी पटकावला. विजेते आणि सहभागींना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात
आले.
यावेळी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण
संस्थेचे प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर नागरे, विभाग प्रमुख डॉ. सुलक्षणा पवार,
अधिव्याख्याता सर्वश्री शिवशंकर मोरे, जगदीश करडे, विलास कडाळे, शिवाजी अध्यापक
विद्यालयाचे प्राचार्य विकासकुमार रोकडे, समुपदेशक राजेश सुर्वे, विषय सहाय्यक विश्वंभर
आळणे, जिल्हा समन्वयिका स्मिता इंगळे, संजीवनी दारोकार यांची प्रमुख उपस्थिती
होती. बक्षिस व प्रमाणपत्र वितरण समारंभात सर्वांच्या सादरीकरणाचे कौतुक करुन या
सारख विविध उपक्रमांमध्ये जिल्हाभरातील जास्तीत जास्त शिक्षकांनी सहभाग
नोंदविण्याचे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले.
*******
Comments
Post a Comment