आज 4 हजार 498 व्यक्तींचे लसीकरण

*आज 4 हजार 498 व्यक्तींचे लसीकरण*

वाशिम दि.13 (जिमाका) जिल्ह्यातील सर्व सहाही तालुक्यात कोविड लसीकरण मोहीम वेगाने राबविण्यात येत आहे.ओमीक्रोन या नव्या विषाणूचा धोका निर्माण झाला असताना नागरिक आता कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी सरसावले आहे.जिल्ह्यात आज 13 डिसेंबर रोजी 4 हजार 498 व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले. यामध्ये पहिला डोस 1 हजार 173 व्यक्तींनी व दुसरा डोस 3 हजार 325 व्यक्तींनी घेतला.
   वाशिम तालुका : पहिला डोस - 242 व दुसरा डोस -670 असा एकूण 912, मालेगाव तालुका : पहिला डोस - 293 आणि दुसरा डोस - 660 एकूण 953, रिसोड तालुका : पहिला डोस - 103 व दुसरा डोस - 256 एकूण 359,कारंजा तालुका : पहिला डोस - 259 आणि दुसरा डोस -623 एकूण 882, मानोरा तालुका : पहिला डोस - 152 व दुसरा डोस 578 एकूण 730 आणि मंगरूळपीर तालुका : पहिला डोस - 124 आणि दुसरा डोस - 538 असा एकूण 662 व्यक्तींना देण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश