31 डिसेंबर व नविन वर्षानिमित्त जिल्हयात साथरोग प्रतिबंध अधिनियम लागू
31 डिसेंबर व नविन वर्षानिमित्त
जिल्हयात साथरोग
प्रतिबंध अधिनियम लागू
वाशिम, दि. 30 (जिमाका) : कोविड- 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात
14 मार्च 2020 पासून साथरोग प्रतिबंध अधिनिम 1897 लागू करण्यात आल्याबाबतची अधिसूचना
14 मार्च 2020 च्या अधिसूचनेनुार नियमावली प्रसिध्द करण्यात आली आहे.17 एप्रिल
2020 च्या आदेशानुसार एकत्रित सुधारीत मार्गदर्शन सूचना देखील निर्गमित करण्यात आल्या
आहे. याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना सक्षम अधिकारी म्हणून
घोषित करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हयात कोविड-19 व विशेषत्वाने ओमिक्रॉन या नव्या
विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून साथरोग
अधिनियम 1897 नुसार जिल्हयात 31 डिसेंबर 2021 वर्ष अखेर व नविन वर्ष 2022 निमित्त पुढीलप्रमाणे
आदेश लागू करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.
कोरोनाच्या
अनुषंगाने ३१ डिसेंबर २०२१ रोजी व १ जानेवारी २०२२ रोजी नववर्ष स्वागताच्या निमित्ताने
नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत शक्यतो घरीच राहून साधेपणाने साजरे करावे.
मदत व पुनर्वसन विभाग यांच्या २४ डिसेंबर २०२१ रोजीच्या आदेशानुसार २५ डिसेंबर २०२१
पासून रात्री ९.०० ते सकाळी ६.०० वाजेपर्यंत ५ पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यावर
बंदी घालण्यात आली आहे, सदर आदेशांचे पालन करण्यात यावे.
कोविड-१९
च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महाराष्ट्र शासन महसूल व वन, आपत्ती व्यवस्थापन,
मदत व पुनर्वसन विभागाचे 27 नोव्हेंबर 2021 च्या परिपत्रकानुसार देण्यात आलेल्या सुचनांचे
तंतोतंत पालन करावे तसेच 24 डिसेंबर 2021 रोजीच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या आदेशानुसार
देण्यात आलेल्या सुचनांचेही पालन करावे. ३१ डिसेंबर २०२१ व नविन वर्ष २०२२ चे स्वागताकरीता
आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना बंदिस्त सभागृहात उपलब्ध आसनक्षमतेच्या ५० टक्केपर्यंत
तर खुल्या जागेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना उपलब्ध आसनक्षमतेच्या २५ टक्केच्या
मर्यादेत उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली आहे. सदर ठिकाणी कोणत्याही प्रकारे
गर्दी होणार नाही व सामाजिक अंतर राखले जाईल तसेच मास्क, सॅनिटायझरचा वापर होईल याकडे
विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. आणि त्याठिकाणी निर्जंतूकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी.
कोरोनाच्या
पार्श्वभुमीवर ६० वर्षावरील नागरिकांनी व दहा वर्षाखालील मुलांनी सुरक्षिततेच्या व
आरोग्याच्या दृष्टीने शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे. ३१ डिसेंबरच्या दिवशी नागरिकांनी
तलाव, बागेत व रस्त्यावर अशा सार्वजनिक ठिकाणी मोठया संख्येने येऊन गर्दी न करता सामाजिक
अंतर राखला जाईल तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक
आहे. नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारे धार्मिक सांस्कृतीक कार्यक्रमाचे
आयोजन करू नये तसेच मिरवणुका काढण्यात येऊ नये.
नविन वर्षाच्या
पहिल्या दिवशी मोठया संख्येत नागरिक धार्मिक स्थळी जात असतात. अशावेळी त्याठिकाणी एकाच
वेळी गर्दी न करता सामाजिक अंतरचे पालन करावे आणि संबंधितांनी आरोग्य व स्वच्छतेच्या
दृष्टीकोनातुन योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात. फटाक्यांची आतिषबाजी करण्यात
येऊ नये. ध्वनीप्रदुषणाच्या अनुषंगाने नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे.
कोविड-
१९ व विशेषत्वाने ओमिक्रॉन या विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगर विकास विभाग, मदत
व पुनर्वसन,आरोग्य, पर्यावरण, वैद्यकिय शिक्षण विभाग तसेच संबंधित नगरपालिका, नगरपंचायत,
पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक
राहील. या परिपत्रकानंतर व ३१ डिसेंबर २०२१ व नविन वर्ष २०२२ सुरु होण्याच्या मधल्या
कालावधीत काही सूचना नव्याने प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील पालन करावे.
या आदेशाचे
पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था अथवा समुह आपत्ती व्यवस्थापन अधिनियम
2005 अन्वये आणि भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध
केला आहे असे मानण्यात येईल. अशा व्यक्ती, संस्था अथवा समूह यांचेवर भारतीय दंड संहितेच्या
कलम 188 अन्वये गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधित ठाण्याचे उपनिरीक्षक दर्जापेक्षा कमी
नाही अशा अधिकाऱ्यास प्राधिकृत करण्यात येत आहे. असे या आदेशात नमुद करण्यात आले आहे.
*******
Comments
Post a Comment