21 व 22 डिसेंबरला दारुची दुकाने बंद राहणार
21 व 22 डिसेंबरला दारुची दुकाने बंद राहणार
वाशिम, दि. 20 (जिमाका) : जिल्हयातील 116 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रमाप्रमाणे होणार आहे. या निवडणूकीसाठी येत्या 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी 22 डिसेंबर रोजी संबंधित तहसिल कार्यालय येथे होणार आहे.
आदर्श आचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीकोणातून मतदान होणाऱ्या ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये मतदानाच्या दिवशी आणि मत मोजणीच्या दिवशी संबंधित तहसिल कार्यालय क्षेत्रामध्ये नियमानुसार दारुची दुकाने बंद राहणार आहे.
*******
Comments
Post a Comment