वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता 31 डिसेंबर घरात राहूनच साजरा करा - पालकमंत्री शंभूराज देसाई
वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता
31 डिसेंबर घरात राहूनच साजरा करा
-पालकमंत्री शंभूराज
देसाई
वाशिम, दि. 30 (जिमाका) : राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग अधिक वेगाने वाढत
आहे. 31 डिसेंबर आणि त्यानंतर नविन वर्षाच्या स्वागतासाठी लोकांची धार्मिकस्थळी मोठया
प्रमाणात गर्दी होत असते. अशा ठिकाणी लोकांनी गर्दी न करता सगळयांनी घरात राहूनच हा
उत्सव साजरा करावा. असे आवाहन पालकमंत्री शंभूराज
देसाई यांनी केले.
31 डिसेंबर
आणि नविन वर्षाच्या पार्श्वभूमिवर कोरोना सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी दुरदृश्य प्रणालीद्वारे
30 डिसेंबर रोजी आयोजित सभेत श्री. देसाई बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी षण्मुगराजन
एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, जिल्हा पोलीस अधीक्षक
बच्चन सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धर्मपाल
खेळकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी
शंकर तोटावार यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री
श्री. देसाई म्हणाले, सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नविन वर्षाच्या स्वागतासाठी
लोकांची धार्मिकस्थळी गर्दी जास्त प्रमाणात गर्दी होणार नाही व कोरोना नियमांचे काटेकोरपणे
पालन होईल याबाबत दक्षता घ्यावी. यावेळी त्यांनी जिल्हयात कोरोना लसीचा उपलब्ध साठा
आणि जिल्हयातील लसीकरणाची सद्यस्थितीबाबतची माहिती जिल्हाधिकारी षण्मुगराजन यांच्याकडून माहिती घेतली.
जिल्हा
पोलीस अधिक्षक यांना जिल्हयात रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग वाढवावे आणि जिल्हयात रात्री
9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू असल्यामुळे या कालावधीत लोकांची गर्दी
होणार नाही याची दक्षता घ्यावी. असे निर्देश पालकमंत्री श्री. देसाई यांनी यावेळी दिले.
जिल्हाधिकारी
षण्मुगराजन एस. यांनी जिल्हयात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे काही शेतकऱ्यांचे नुकसान
झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे सुरु असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
*******
Comments
Post a Comment