*निवडणूक निरीक्षक डॉ.दिलीप पांढरपट्टे यांनी केली मतदान केंद्राची पाहणी
*निवडणूक निरीक्षक डॉ.दिलीप पांढरपट्टे यांनी केली मतदान केंद्राची पाहणी*
वाशिम दि 5 (जिमाका) विधानपरिषदेच्या अकोला - वाशिम- बुलढाणा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले निवडणूक निरीक्षक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज 5 डिसेंबर रोजी वाशिम जिल्ह्यातील चारही मतदान केंद्राला भेट देऊन पाहणी केली. मतदानाच्या दृष्टीने केलेल्या तयारीची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. रिसोड येथील तहसील कार्यालयातील मतदान केंद्राला भेट देऊन डॉ. पांढरपट्टे यांनी तहसीलदार अजित शेलार यांच्याकडून मतदान केंद्रावर मतदानाच्या दृष्टीने केलेल्या तयारीचा आढावा घेतला.वाशीम येथील तहसील कार्यालयात मतदान केंद्र असलेल्या सभागृहाची पाहणी केली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, प्रभारी उपविभागीय अधिकारी नितीन चव्हाण, तहसीलदार विजय साळवे, मंगरूळपीर तहसील कार्यालयातील तसेच कारंजा तहसील कार्यालयातील मतदान केंद्राला देखील भेट दिली. मतदान केंद्रावर केलेल्या तयारीची माहिती घेतली.यावेळी मंगरूळपीर उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे,तहसीलदार श्री.कोंढागुरले,कारंजा उपविभागीय अधिकारी राहुल जाधव व तहसीलदार धीरज मांजरे यावेळी उपस्थित होते.
Comments
Post a Comment