जिल्हाधिकाऱ्यांची मंगरूळपीर तालुक्यातील काही गावांना आणि शिवाराला भेट*
*जिल्हाधिकाऱ्यांची मंगरूळपीर तालुक्यातील काही गावांना आणि शिवाराला भेट*
* लसीकरण केंद्राला भेट
* शिवारात ई-पीक पाहणी
वाशिम दि.31(जिमाका) जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आज 31 डिसेंबर रोजी मंगरुळपीर तालुक्यातील दस्तापूर, शेलुबाजार, वनोजा व तराळा येथील लसीकरण केंद्राला भेट दिली. दस्तापूर येथील शेतकरी विष्णू अटपडकर यांच्या शिवारात जाऊन ई- पीक पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या समवेत उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
दस्तापूर येथे सुरू असलेल्या लसीकरण केंद्राला भेट देऊन लस घेण्यासाठी आलेल्या व्यक्तींशी जिल्हाधिकाऱ्यांनी संवाद साधला. लसीकरण केंद्रात कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांकडून गावातील लसीकरणासाठी पात्र व्यक्तींची माहिती घेतली. आतापर्यंत पहिला डोस आणि दुसरा डोस किती व्यक्तीने घेतला आहे, ज्यांनी पहिला डोस अद्यापही घेतला नाही त्यांच्या घरी जाऊन कर्मचाऱ्यांनी त्यांना लसीकरण केंद्रावर येण्यासाठी सांगावे.बाहेरगावी किती व्यक्तींनी लस घेतली आहे, बाहेरगावी असलेल्या व्यक्तींनी लस घेतल्याची खातरजमा करण्यात यावी. दुसरा डोससाठी ज्या व्यक्ती पात्र आहेत, त्यांना विहित कालावधीत दुसरा डोस द्यावा. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पात्र व्यक्तींनी घेणे आवश्यक आहे. असे ते म्हणाले.
दस्तापूर शिवारातील शेतकरी विष्णू अटपडकर यांच्या शेतीला जिल्हाधिकारी षण्मुगराजन यांनी भेट देऊन ई - पीक पाहणी केली.यावेळी उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे, नायब तहसीलदार डी.जे.चौधरी, तलाठी एच.डी. खिल्लारे यांच्यासह दस्तापूरचे सरपंच तसेच गावातील अन्य शेतकरी बांधव उपस्थित होते.
जिल्हाधिकारी षण्मुगराजन यांनी ई-पीक पाहणीचे महत्व उपस्थित शेतकर्यांना सांगितले.
ई - पीक पाहणी करताना आलेल्या अडचणीची माहिती त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांकडून घेतली.खरीप आणि रब्बी हंगामात प्रत्येक शेतकऱ्यांनी ई- पीक पाहणीच्या माध्यमातून पिकांची नोंदणी करावी. पिकाचे नुकसान झाले तर नुकसान भरपाई मिळण्याचा ई - पीक पाहणी उपयुक्त असल्याचे त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सांगितले
Comments
Post a Comment