चेतन सेवांकुर संस्थेत दिव्यांग दिन साजरा

 

चेतन सेवांकुर संस्थेत

दिव्यांग दिन साजरा

वाशिम, दि. 03 (जिमाका) :  केकतउमरा येथील चेतन सेवांकुर संस्थेत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने जागतिक दिव्यांग दिन आज 3 डिसेंबर रोजी साजरा करण्यात आला. या ठिकाणी दृष्टिहीन बालकांनी गायन सादर केले. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्या. एस.पी. शिंदे, मुख्य न्यायदंडाधिकारी आर.पी. कुलकर्णी, जिल्हा विधीज्ञ संघाचे सचिव ॲड. एन.पी. जुमडे, सहसचिव ॲड. व्हि. जे. सानप यांचे संस्थेच्यावतीने स्वागत करण्यात आले. उपस्थित दृष्टिहीन बालकांना दिव्यांग व्यक्तीचे अधिकार अधिनियम 2016 च्या तरतुदीविषयी माहिती देवून त्यांच्याशी चर्चा केली व त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. दिव्यांग व्यक्तीचे अधिकार अधिनियम 2016 च्या तरतुदीविषयी न्या. शिंदे व न्या. कुलकर्णी यांनी माहिती दिली. ॲड. जुमडे यांनी चेतन सेवांकुर संस्थेच्या सर्व सदस्यांचे आभार मानले. यावेळी विधी सेवा प्राधिकरणचे कर्मचारीसुध्दा उपस्थित होते.

                                                                                   


*******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश