जिल्हयातील 11 लाख
69 हजार व्यक्तींचे कोविड लसीकरण
पहिला डोस 74.29 टक्के तर दुसरा डोस 44.77 टक्के
पात्र व्यक्तींनी लस घेण्याचे आवाहन
वाशिम, दि. 01 (जिमाका) : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट केंव्हा येणार हे सांगता येत नाही. मात्र
कोरोना संसर्गाचा प्रतिबंध करण्यासाठी कोविड प्रतिबंधक लस घेणे हा एकमेव उपाय आहे.
जिल्हयातील सर्व पात्र व्यक्तींचे लसीकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.
यांच्या मार्गदर्शनाखाली विविध यंत्रणा काम करीत आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील
पात्र व्यक्तींचे लसीकरण करण्याच्या कामाला वेग आला आहे. जिल्हयातील सर्वच पात्र
व्यक्तींनी कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी लस घ्यावी. असे आवाहन जिल्हा
प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासनाकडून कोरोना
लसीकरणाबाबत तालुका यंत्रणांच्या वेळोवेळी आयोजित बैठकांमधून आढावा घेण्यात येत
आहे. नियोजनबध्द सर्वच पात्र व्यक्तींचे 100 टक्के लसीकरण करण्यावर भर देण्यात आला
आहे. 16 जानेवारी 2021 ते 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत जिल्हयातील 11 लाख 69 हजार 501
व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये पहिला डोस 7 लाख 29 हजार 703
व्यक्तींना आणि 4 लाख 39 हजार 798 व्यक्तींना दुसरा डोस देण्यात आला आहे. पहिला
डोसचे प्रमाण 74.29 टक्के आणि दुसरा डोसचे प्रमाण 44.77 टक्के इतके आहे.
जिल्हयाच्या 13 लाख 74 हजार 735
लोकसंख्येपैकी कोविड लसीकरणासाठी 9 लाख 82 हजार 300 व्यक्ती पात्र ठरले. आतापर्यंत
11 लाख 69 हजार 501 व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले. यामध्ये दोन्ही डोसचा समावेश
आहे. रिसोड तालुक्याच्या 2 लाख 32 हजार 959 लोकसंख्येपैकी 1 लाख 66 हजार 465
व्यक्ती लसीकरणासाठी पात्र ठरले. यातील 1 लाख 35 हजार 602 व्यक्तींनी पहिला डोस
आणि 86 हजार 825 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला. पहिला डोस घेणाऱ्यांचे प्रमाण 81.46
टक्के आणि दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण 52.16 टक्के आहे. कारंजा तालुक्याच्या 2
लाख 39 हजार 991 लोकसंख्येपैकी लसीकरणासाठी 1 लाख 71 हजार 560 व्यक्ती पात्र ठरले.
त्यापैकी पहिला डोस 1 लाख 39 हजार 196 व्यक्तींना आणि दुसरा डोस 85 हजार 183
व्यक्तींना देण्यात आला. पहिला डोसचे प्रमाण 81.14 टक्के आणि दुसऱ्या डोसचे प्रमाण
49.65 टक्के इतके आहे.
वाशिम तालुक्याच्या 2 लाख 86
हजार 435 लोकसंख्येपैकी 2 लाख 4 हजार 501 व्यक्ती लसीकरणासाठी पात्र ठरले असून 1
लाख 64 हजार 602 व्यक्तींना पहिला डोस आणि 1 लाख 7 हजार 385 व्यक्तींना दुसरा डोस
देण्यात आला. पहिला डोसचे प्रमाण 80.49 टक्के आणि दुसरा डोसचे प्रमाण 52.51 टक्के
आहे. मंगरुळपीर तालुक्यातील 1 लाख 96 हजार 662 लोकसंख्येपैकी 1 लाख 40 हजार 613
व्यक्ती लसीकरणासाठी पात्र ठरले असून आतापर्यंत 1 लाख 11 हजार 382 व्यक्तींनी
पहिला डोस आणि 65 हजार 183 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला. पहिला डोस घेणाऱ्यांचे
प्रमाण 79.21 टक्के आणि दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण 46.36 टक्के आहे.
मानोरा तालुक्यातील 1 लाख 84
हजार 488 लोकसंख्येपैकी 1 लाख 31 हजार 808 व्यक्ती लसीकरणासाठी पात्र ठरले. यापैकी
80 हजार 137 व्यक्तींना पहिला डोस आणि 41 हजार 292 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला
आहे. पहिला डोस घेणाऱ्यांचे प्रमाण 60.80 टक्के आणि दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण
31.33 टक्के आहे. मालेगांव तालुक्यातील 2 लाख 34 हजार 200 लोकसंख्येपैकी 1 लाख 67
हजार 353 व्यक्ती लसीकरणासाठी पात्र ठरले असून त्यापैकी पहिला डोस 98 हजार 784
व्यक्तींनी घेतला तर दुसरा डोस 53 हजार 930 व्यक्तींनी घेतला पहिला डोस
घेणाऱ्यांचे प्रमाण 59.03 टक्के आणि दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण 32.23 टक्के
आहे.
*******
Comments
Post a Comment