बार्टीची कौशल्य विकास कार्यशाळा संपन्न
बार्टीची कौशल्य विकास कार्यशाळा संपन्न
वाशिम, दि. 10
(जिमाका) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे व सहायक
आयुक्त समाज कल्याण, वाशिम यांच्या संयुक्तवतीने 9 डिसेंबर रोजी भारतीय
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय
भवन येथे कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत कौशल्य विकास कार्यशाळा संपन्न झाली. या
प्रसंगी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष श्री. एल. बी. राऊत, समाज
कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता
मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीमती सुनंदा बजाज, जात पडताळणीचे पोलीस उप
अधिक्षक एस.बी. सातर्डेकर व महाराष्ट्र उद्योजकात विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी
श्री. प्रसन्न रत्नपारखी उपस्थित होते.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक
आयुक्त श्रीमती सुनंदा बजाज यांनी जास्तीत जास्त युवक-युवतींनी कौशल्य विकासाचे
प्रशिक्षण घ्यावे असे आवाहन केले. जिल्हयाचा कौशल्य विकास आराखडा तयार करण्यात आला
असून 1300 पेक्षा जास्त उमेदवारांना यामध्ये प्रशिक्षण घेता येणार असल्याचे
त्यांनी सांगीतले व त्यांच्या विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती
दिली. तसेच 12 ते 17 डिसेंबर दरम्यान आयोजित राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्यामध्ये
सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
श्री. वाठ यांनी कौशल्य
विकासाअंतर्गत कौशल्य विकास प्रशिक्षण वर्गाच्या अनुषंगाने प्रास्ताविकातून माहिती
दिली. श्री. सातर्डेकर यांनी कौशल्य विकासाच्या अनुषंगाने उद्योगाबाबत माहिती
दिली. श्री. रत्नपारखी यांनी कौशल्य विकास प्रशिक्षणाबाबत कौशल्य आणि उद्योजकता
परिचय मेळावा याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यशाळेला ग्रामीण व शहरी भागातील
युवक-युवती मोठया संख्येने उपस्थित होते. तसेच बार्टीच्या प्रकल्प अधिकारी व
त्यांच्या अंतर्गत कार्यरत असलेले समतादूत तसेच कार्यालयातील कर्मचारी उपस्थित
होते. प्रकल्प अधिकारी वसंत गव्हाळे यांनी आभार मानले.
*******
Comments
Post a Comment