तंत्र शिक्षण एक संधी या विषयावर 24 डिसेंबरला ऑनलाईन वेबीनार

 


तंत्र शिक्षण एक संधी या विषयावर

24 डिसेंबरला ऑनलाईन वेबीनार

           वाशिम, दि. 23 (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिमच्यावतीने युवक-युवतींसाठी 24 डिसेंबर रोजी दुपारी 3 ते  दुपारी 4.30 या वेळेत जिल्हा उद्योक केंद्रामार्फत नवउद्योजकांना मार्गदर्शन तसेच तंत्र शिक्षण एक संधी या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा उद्योग केंद्र परभणीचे प्रभारी जिल्हा व्यवस्थापक रविंद्र पत्की आणि परभणी येथील श्री शिवाजी पॉलटेक्निकचे ट्रेनिंग ॲन्ड प्लेसमेंट अधिकारी श्री. ज्ञानेश्वर तरवटे हे मार्गदर्शन करणार आहे. तरी इच्छुक युवक/युवतींनी या वेबिनारचा लाभ घ्यावा. या वेबीनारमध्ये सहभागी होण्यासाठी फेसबुक https://www.facebook.com/MaharashtraSDEED आणि युट्युब https://www.youtube.com/channel/UC702gQB5q7ValTABN4FHw1A या माध्यमातून सहभागी व्हावे. असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज यांनी कळविले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश