ग्राहकांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे* तहसीलदार शेलार
ग्राहकांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे*
तहसीलदार शेलार
वाशिम दि.24 (जिमाका) बदलता काळ लक्षात घेता ग्राहकांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून आपले प्रश्न अभ्यासपूर्ण मांडून न्याय मिळवून द्यावा.असे प्रतिपादन तहसीलदार अजित शेलार यांनी केले.
रिसोड तहसील कार्यालयात आज 24 डिसेंबर रोजी आयोजित राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी तालुका ग्राहक मंच अध्यक्ष कमलकाका बगडे होते. नायब तहसीलदार नपते यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
तहसीलदार श्री.शेलार म्हणाले, ग्राहक म्हणून आपलेही काही कर्तव्य असायला पाहिजे.आपण आपले प्रश्न लोकशाही मार्गाने व अभ्यासपूर्ण मांडले असता त्याची सोडवणूक निश्चितच होते. येत्या जानेवारी महिन्यामध्ये रिसोड तालुक्यातील सर्व कार्यालय प्रमुखांची व ग्राहक पंचायतच्या सदस्यांची एक समन्वय सभा आयोजित करून ग्राहकांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जयंत वसमतकर, संतोष वाघमारे, माजी मुख्याध्यापक गजानन बानोरे, संजय उखळकर यांनीही विचार व्यक्त केले.या कार्यक्रमाला ग्राहक पंचायतचे भगवानराव निरबाण, सुधाकरराव पाठक,डॉ. रामानंद गट्टाणी,श्री.झडपे, भारत नागरे ,विनोद खडसे, डॉ कोकाटे,प्रा. संजय गायकवाड, पुरवठा विभागाचे बळीराम मुंडे ,रवी जाधव , शिंदे ,भगत ,सादिक उपस्थित होते .कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार संतोष बोडखे यांनी मानले.
Comments
Post a Comment