*मालेगाव येथील खुनासह दरोड्याचा मालेगाव पोलिसांनी ४८ तासाच्या आत लावला छडा.*

*मालेगाव येथील खुनासह दरोड्याचा मालेगाव पोलिसांनी ४८ तासाच्या आत लावला छडा.*

वाशिम दि.२५ (जिमाका) पोलिस स्टेशनमालेगाव येथे २१ डिसेंबर रोजी रात्री ८.३० ते ९ वाजेदरम्यान अंजनकर ज्वेलर्सचे मालक योगेश गजानन अंजनकर हे त्याचे सोन्याचे दुकाम बंद करून अंदाजे २०० ग्रॅम सोन्याचे गोळे व नगदी ९०००/- रु. असा एकूण माल ९,०९,०००/- रु.चा माल असलेली बॅग घेऊन त्यांच्या दुकानामध्ये काम करणारा कारागीर रवींद्र वाळेकर यास सोबत घेऊन घरी जात असतांना लाड वकिलांचे घराचे मागे, देशपांडे लेआउट मालेगाव येथे अज्ञात दरोडेखोरांनी त्यांची गाडी अडवून योगेश अंजनकर व रवींद्र वाळेकर यांचे डोळ्यात मिरची पूड फेकून त्यांच्यावर चाकूने वार केले ज्यामध्ये योगेश अंजनकर व रवींद्र वाळेकर हे गंभीर जखमी झाले. त्यानंतर आरोपींनी परिसरात दहशत पसरविण्याचे उद्देश्याने गावठी कट्ट्यामधून गोळीबार केला व योगेश अंजनकर यांचेजवळील ९,०९,०००/- रु.चा मुद्देमाल असलेली बॅग घेऊन मोटारसायकलने पळून गेले.मालेगाव पोलीस स्टेशनमध्ये येथे या घटनेतील अज्ञात आरोपीविरुद्ध अप.क्र.२५५/२१ कलम ३९६, ३९७ भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

             सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह, अपर पोलीस अधीक्षक श्री.गोरख भामरे,उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.सुनील पुजारी यांनी दिलेल्या सूचना व मार्गदर्शनाखाली मालेगाव येथील तपास पथकाने त्यांचे गोपनीय माहितीदारांच्या माध्यमातून आणि तांत्रिकदृष्ट्या तपास चक्रे गतीने फिरवून अवघ्या ४८ तासांच्या आत गुन्ह्याची उकल करून मालेगाव तालुक्यातील ग्राम सुकांडा येथून पंजाबराव घुगे यास अटक करून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले दोन गावठी कट्टे व लहान मोठे सोन्याचे गोळ्याचे तुकडे ज्याचे वजन ५३ ग्राम अंदाजित रक्कम २,४०,०००/- रु.चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सदर आरोपी यांनी १२ लाखाची पोल्ट्री बांधली होती. त्याकरिता त्याला खूप खर्च आला होता. त्याकरिता त्याने स्वतःचे सोनेही यातील फिर्यादी अंजनकर ज्वेलर्सकडे गहाण ठेवले होते. पोल्ट्रीकरिता पैशाची अत्यंत गरज होती. त्याकरिता आरोपी हे वारंवार सोनार अंजनकर ज्वेलर्स यांचेकडे जात होते. त्यादरम्यान त्यांचे आपसी मतभेद झाल्यामुळे आरोपी व गुन्ह्यातील उर्वरित साथीदार यांचे मदतीने सदर गुन्हा घडवून आणला. सदर तपासाची चक्रे फिरवून गुन्ह्यातील उर्वरित आरोपींचा शोध कामी पोउपनि.रामकिसन जायभाये, पोउपनि.महल्ले,पोउपनि.शेख तसेच स्थानिक गुन्हे शाखा यांचे तपास पथक वेगवेगळ्या दिशेने रवाना करण्यात आले आहे.सदर गुन्ह्यातील उर्वरित आरोपी यांना सुद्धा लवकरात लवकर अटक करण्यात येईल.
                सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह,अपर पोलीस अधीक्षक गोरख भामरे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पुजारी,पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगाव येथील तपास पथक पोलीस निरीक्षक प्रवीण धुमाळ, सपोनि पुष्पलता वाघ, पोउपनि आकाश महल्ले,पोउपनि रामकिसन जायभाये,पोहेकॉ. कैलास कोकाटे,पोहेकॉ.प्रशांत वाडकर, पोहेकॉ.गजानन झगरे पोहेकॉ.गजानन पांचाळ, नापोकॉ.आशिष बिडवे, पोकॉ.सुधीर सोळंके, पोकॉ.गणेश बोडके, पोकॉ.आशिष किल्लेकर, पोकॉ.अमोल पाटील, पोकॉ.विजू इंगोले, पोकॉ.संदीप वायाळ, पोकॉ.किशोर नवलकर व सायबर सेल येथील पोकॉ.दीपक घुगे आणि नापोकॉ.महेश वानखेडे व स्थानिक गुन्हे शाखा वाशीम येथील यांच्या पथकाने गुन्हा उघडकीस आणण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे.

Comments

Popular posts from this blog

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

विद्युत सुरक्षा सप्ताहाचा समारोप