कोरोना विषाणू पार्श्वभूमीवर* *जिल्हा प्रशासनाची सुधारित नवी नियमावली**रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र जमण्यास प्रतिबंध*
कोरोना विषाणू पार्श्वभूमीवर*
*जिल्हा प्रशासनाची सुधारित नवी नियमावली*
*रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र जमण्यास प्रतिबंध*
वाशिम दि. 26 (जिमाका) कोरोनाच्या नव्या ओमायक्रोन विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात निर्बंध लावण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.यांनी 25 डिसेंबर रोजी आदेश निर्गमित केले आहे. नव्याने काही निर्बंधाचा यामध्ये समावेश केला आहे.
जिल्ह्यात विवाह समारंभ बंद जागेमध्ये आयोजित करतांना किंवा
अन्य सामाजिक,राजकीय किंवा धार्मिक कार्यक्रम आणि मेळाव्यात जास्तीत जास्त 100 लोकांच्या उपस्थितीची मर्यादा पाळण्यात यावी, जर असे समारंभ मोकळ्या जागेत आयोजित केले जात असल्यास जास्तीत जास्त 250 लोकांची किंवा त्या ठिकाणच्या क्षमतेच्या 25 टक्के यापैकी जी संख्या कमी असेल इतक्या व्यक्तींच्या उपस्थिती मर्यादेचे पालन करण्यात यावे.
नमूद केलेल्या कार्यक्रमा व्यतिरिक्त इतर कार्यक्रमाचे आयोजन बंद जागेमध्ये करीत असताना आसनव्यवस्था निश्चित असलेल्या ठिकाणी त्या जागेच्या 50 टक्के क्षमते इतक्या उपस्थितांच्या मर्यादेचे पालन करण्यात यावे. बंद जागेमध्ये परंतु आसन व्यवस्था निश्चित नसलेल्या ठिकाणी असे कार्यक्रम आयोजित करताना आसन व्यवस्था जागेच्या 25 टक्के क्षमतेइतक्या उपस्थितांच्या मर्यादेचे पालन करण्यात यावे.असे कार्यक्रम मोकळ्या जागेमध्ये आयोजित करत असतांना त्या जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के पेक्षा अधिक उपस्थित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
क्रीडा इव्हेंट/स्पर्धेच्या बाबतीत जागेच्या एकूण प्रेक्षक संख्येच्या 25 टक्केपेक्षा जास्त नसलेल्या ठिकाणी आयोजित करता येईल. इतर कुठल्याही प्रकारच्या कार्यक्रमासाठी वर नमूद केलेल्या सुचित येत नाही,त्यांना 27 नोव्हेंबर 2021 च्या आदेशात नमूद केल्याप्रमाणे कोविड अनुरूप वर्तनाचे जसे मास्कचा वापर करणे,सामाजिक सुरक्षित अंतर राखणे व सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक राहील.
हॉटेल,रेस्टॉरंट,जिम,स्पा,योगा सेंटर, सिनेमा व नाट्यगृहे व इतर मनोरंजन केंद्रे ही तेथील आसन क्षमतेच्या 50 टक्के मर्यादेच्या अधीन राहून सुरू ठेवता येईल.परवाना/परवानगी असलेल्या एकूण आसन क्षमता व परवानगी देण्यात आलेली 50 टक्के क्षमता याबाबतचे सूचना फलक दर्शनी भागात लावणे बंधनकारक राहील.सर्व संबंधित आस्थापनेने त्यांच्या व्यवस्थापनात कर्मचारी आणि प्रवेश करणाऱ्या सर्व नागरिकांची कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणचे दोन्ही डोस घ्यावे.दुसरा डोस घेतल्यानंतर 14 दिवस पूर्ण झालेत याची खात्री करावी.प्रतिबंधात्मक उपाययोजनेचे पालन केले जात आहे किंवा नाही याची खातरजमा करण्यासाठी आस्थापनेची सक्षम प्राधिकाऱ्याने तपासणी करावी.
वाशिम जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा अधिक व्यक्तींना रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत एकत्र येण्यास कलम 144 च्या आदेशाने मनाई करण्यात आली आहे.
या आदेशात नमूद केलेल्या निर्बंधाव्यतिरिक्त इतर सर्व निर्बंध जसे आहेत तसेच लागू राहतील. यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेले कोरोना निर्बंध आदेश व मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील.
जिल्ह्यात कोविड- 19 च्या प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशांचे व मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणारी व्यक्ती ही आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 तसेच भारतीय दंड संहिता कलम 188 नुसार व अन्य कायदेशीर तरतुदीनुसार कायदेशीर कार्यवाहीस पात्र असेल.
हा आदेश वाशिम जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात 25 डिसेंबर 2021 पासून पुढील आदेशापर्यंत लागू राहील.असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.यांनी कळविले आहे.
********
Comments
Post a Comment