13 ते 27 डिसेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश
13 ते 27 डिसेंबरपर्यंत
प्रतिबंधात्मक
आदेश
वाशिम, दि. 10
(जिमाका) : जिल्हयात कायदा व सुव्यवस्था राखण्यास सुलभ व्हावे यासाठी जिल्हादंडाधिकारी
षण्मुगराजन एस. यांचे मुंबई पोलीस अधिनियमाची कलम 37 (1) (3) चे प्रतिबंधात्मक
आदेश 13 ते 27 डिसेंबर 2021 या काळात लागू राहणार आहे. जिल्हयात 25 डिसेंबर रोजी
ख्रिश्चन धर्मिंयांचा नाताळ हा सण साजरा करण्यात येणार आहे. जिल्हयात मानोरा
नगरपंचायतीची निवडणूक आणि 118 ग्रामपंचायतीच्या पोट निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर
करण्यात आला आहे. यासाठी 21 डिसेंबर रोजी मतदान आणि 22 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार
आहे. जातीयदृष्टया संवेदनशील आहे. अलीकडच्या काळात शेजारच्या अकोला, अमरावती आणि
यवतमाळ जिल्हयात घडलेल्या जातीय घटनेच्या प्रतिक्रीया आगामी सण, उत्सव व
निवडणूकीच्या काळात उमटून जिल्हयात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची
शक्यता नाकारता येत नाही.
सद्यस्थितीत राज्यात एसटी महामंडळ कर्मचारी हे महामंडळास राज्य शासनात
समावेश करण्याच्या मागणीसाठी कामबंद आंदोलन करीत आहे. राज्यात नौकरीमध्ये पदोन्नतीत
मागासवर्गींना 33 टक्के आरक्षण कायम ठेवावे या मागणीसाठी विविध कर्मचारी
संघटनांकडून विविध प्रकारच्या आंदोलनाचे आयोजन करण्यात येत आहे. एमएसपी कायदा लागू
करणे, शेतकरी कर्जमाफी, पीक कर्ज मंजूरी, दूध दरवाढ, वाढती महागाई, वीज बिल माफी,
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तसेच इतर विविध मागण्या संदर्भात विरोधी पक्ष व शेतकरी
संघटना इत्यादीच्या वतीने आंदोलनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले जाण्याची शक्यता
नाकारता येत नाही.
सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींच्या जमावास
एकत्र जमण्यास किंवा मिरवणूक काढण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात आली आहे. तसेच
जिल्हयामध्ये कोविड-19 प्रतिबंधक उपाययोजनांच्या अनुषंगाने आदेश लागू असून त्याचे
पालन करण्याच्या दृष्टीने कामावरील कोणतेही पोलीस अधिकारी किंवा इतर शासकीय
/निमशासकीय कर्मचारी किंवा विवाह, अंत्ययात्रा तसेच सक्षम अधिकारी यांनी
विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणूकीस व कार्यक्रमास हे प्रतिबंधात्मक आदेश लागू
राहणार नाही.
*******
Comments
Post a Comment