इयत्ता 6 वी प्रवेश : 16 व 17 डिसेंबरपर्यंत चुकीची दूरुस्ती करता येणार

 


इयत्ता 6 वी प्रवेश : 16 व 17 डिसेंबरपर्यंत

चुकीची दूरुस्ती करता येणार

वाशिम, दि. 10 (जिमाका) : सीबीएससीव्दारे घेण्यात येणारी जवाहन नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा इयत्ता 6 वी साठी ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरलेले आहे. त्यांनी अर्ज भरतांना जर काही चूका झाल्या असल्यास correction windo दिनांक 16 व 17 डिसेंबरला खुली राहणार आहे. अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी लिंग (पुरुष-महिला), श्रेणी (सामान्य/ओबीसी/एससी/एसटी), क्षेत्र (ग्रामीण/शहरी), दिव्यांगत्व व परीक्षेचे माध्यम दूरुस्त करता येईल.

तरी ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरतेवेळी चूकीने चुकीची माहिती भरली असल्यास अशा विद्यार्थ्यांनी 16 व 17 डिसेंबरला त्याने केलेल्या चूकीची दूरुस्ती करावी. याची सर्व पालकांनी नोंद घ्यावी. असे जवाहन नवोदय विद्यालयाचे प्राचार्य एस.डी. खरात यांनी कळविले आहे.  

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश