ऑन फार्म प्रशिक्षण शेतकरी अभ्यास दौऱ्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज मागविले

 


ऑन फार्म प्रशिक्षण

शेतकरी अभ्यास दौऱ्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज मागविले

          वाशिम, दि. 22 (जिमाका) : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातील मनुष्यबळ विकास कार्यक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण कार्यक्रम अर्थात ऑन फार्म प्रशिक्षण देण्यात येत आहे. फलोत्पादन तसेच कृषि क्षेत्राशी निगडीत काम करणाऱ्या संशोधन संस्था, भारतीय कृषि अनुसंधान परिषदेअंतर्गत संशोधन संस्था कृषि विज्ञान केंन्द्र पुणे, अहमदनगर व सोलापूर या ठिकाणी कार्यरत आहे. फलोत्पादन आणि प्रक्रिया क्षेत्रात काम करणारे शेतकरी अभ्यास दौरा व प्रशिक्षणाचे आयोजन उपविभागीय कृषि अधिकारी वाशिम कार्यालयामार्फत करण्यात येणार आहे.

             या पाच दिवशीय प्रशिक्षण दौऱ्यासाठी शासनाच्यावतीने अनुदानावर सहलीसाठी इच्छुक शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. प्रत्यक्ष अनुभवावर आधारित राबविलेल्या उपक्रमांची पाहणी करुन, शेती कृषी क्षेत्रात उत्पन्न वाढीच्या संधीचा अभ्यास शेतकऱ्यांना करता येणार आहे. फळबाग लागवड, कांदाचाळ, संरक्षित शेती, काढणी पश्चात व्यवस्थापन, प्राथमिक प्रक्रिया याबाबत लाभ घेतलेल्या तसेच लाभ घेऊ इच्छीत असलेल्या शेतकऱ्यांनी उपविभागीय कृषि अधिकारी वाशिम येथे ३१ डिसेबरपर्यंत अर्ज सादर करावे. असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी निलेश ठोंबरे यांनी केले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश