3 ते 12 जानेवारी दरम्यान सावित्रीबाई फुले व जिजाऊ जयंतीनिमित्त जनजागृती अभियान

 


3 ते 12 जानेवारी दरम्यान

     सावित्रीबाई फुले व जिजाऊ जयंतीनिमित्त जनजागृती अभियान

वाशिम, दि. 31 (जिमाका) : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हया भारतीय शिक्षिका, कवयित्री व समाजसुधारक होत्या. त्यांनी आशिया खंडातील पहिली मुलींची शाळा पुणे येथे सुरु केली. महाराष्ट्रात स्त्री शिक्षण व शुद्रामध्ये शिक्षणाचा प्रसार केला. त्या भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका होत्या. महिला क्षेत्रात त्यांनी दिलेले महत्वपुर्ण योगदान विचारात घेता, या वर्षी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा 3 जानेवारी हा जन्मदिवस जिल्ह्यातील प्रत्येक अंगणवाडीमध्ये साजरा करण्यात येत आहे. महिला व बाल कल्याण विभाग, जिल्हा परिषद, वाशिमअंतर्गत बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानाअंतर्गत 3 जानेवारी ते 12 जानेवारी 2022 या कालावधीत सावित्रीबाई फुले व जिजाऊ माँ साहेब जयंतीनिमीत्त जनजागृती अभियान राबवून जिल्हयात जयंती साजरी करण्यात येणार आहे.

जयंतीनिमित्त अंगणवाडी केंद्रस्तरावर पुढीलप्रमाणे कार्यक्रम घेण्यात येणार आहे. पाच वर्षाखालील मुलींचे कन्या पुजन करणे, मुलींच्या जन्माचा उत्सव साजरा करताना मुलींच्या जन्मावर वृक्षारोपण करणे, मुलींच्या आर्थिक स्थिरतेसाठी जागरुकता निर्माण करणे, पालकांना प्रोत्साहित करुन मुलींच्या उपलब्ध असलेल्या बँक खात्यात कुंटुबातील सदस्य यांना पैसा जमा करण्याकरिता प्रोत्साहित करणे, टी.व्ही आणि आकाशवाणी केंद्रावर मुलींच्या कल्याणासाठी सामुदायीक कृती करणे, स्वस्थ बालक-बालिका स्पर्धा 8 ते 14 जानेवारी 2022 या कालावधीत अंगणवाडी केंद्रामध्ये आयोजन करणे. अशाप्रकारचे कार्य जिल्हयामध्ये प्रत्येक अंगणवाडी केंद्रामध्ये कार्यक्रम घेण्यात यावे. असे जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे यांनी कळविले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश