पांगरी (नवघरे) येथे जनावरांचे लसीकरण व उपचार शिबीर

 



पांगरी (नवघरे) येथे

जनावरांचे लसीकरण व उपचार शिबीर

वाशिम, दि. 23 (जिमाका) : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्ताने मालेगांव पशुवैद्यकीय दवाखान्याअंतर्गत येत असलेल्या पांगरी (नवघरे) येथे 22 डिसेंबर रोजी पाळीव जनावरांचे तोंडखुरी व पायखुरी लसीकरण तसेच गर्भ तपासणी, व्यंध्यत्व तपासणी करुन आयोजित शिबीरात उपचार करण्यात आले.

जनावरांचे लसीकरण व उपचार पशुधन विकास अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर देशमुख, पशुधन पर्यवेक्षक डॉ. सुनिता सोळंके, सहायक पट्टीबंधक व्ही.सी. कांबळे यांनी केले. या शिबीरात 284 जनावरांचे लसीकरण व उपचार करण्यात आले.

यावेळी उपसरपंच सुधाकर नवघरे, ग्रामपंचायतचे सदस्य शंकर नवघरे, केशव नवघरे, लक्ष्मण नवघरे, भानुदास नवघरे, विष्णु नवघरे, गजानन इढोळे, तुळसीराम खडसे, पांडुरंग नवघरे, शंकर नवघरे यांचेसह अन्य पशुपालक यावेळी उपस्थित होते. उपस्थित पशुपालक शेतकऱ्यांना डॉ. देशमुख यांनी पशुंच्या लसीकरणाची आवश्यकता, वंध्यत्वे तपासणी, गर्भतपासणी, चारा बियाणे, अनुवांशिक सुधारणा आणि विविध पुशपालन योजनांची माहिती दिली.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश