Posts

Showing posts from July, 2016

वाशिम जिल्ह्यात ८२३ कोटी ४२ लक्ष रुपये पीक कर्जाचे वितरण

·          १ लक्ष ६ हजार शेतकऱ्यांना मिळाला लाभ ·          पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना यश ·          खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना मिळाला आधार वाशिम ,  दि .  ३१  :     गतवर्षीच्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेती उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने बळीराजाचे अर्थकारण बिघडले होते. आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्यांना सन २०१६ च्या खरीप हंगामात मशागत, पेरणीकरिता मदतीचा हात देण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने घेतला होता. पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील, राहुल द्विवेदी यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे वाशिम जिल्ह्यात खरीप हंगामासाठी ८२३ कोटी ४२ लक्ष रुपये पिक कर्ज स्वरुपात वितरीत करण्यात आले आहेत. यंदा चांगला पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने पेरणी खालील क्षेत्र वाढ होण्याचा अंदाज होता. त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पेरणीसाठी जमिनीची मशागत करणे, बियाणे व खते खरेदी करण्याकरिता वेळेवर कर्ज उपलब्ध करून दे

जलयुक्त शिवार अभियानाची यशोगाथा...

Image

शेततळे ठरणार पिकांसाठी वरदान...

Image
                          ‘मागेल त्याला शेततळे’ या राज्य शासनाच्या महत्त्वकांक्षी योजनेचा लाभ घेऊन तोंडगाव (ता. जि. वाशिम) येथील शेतकरी भानुदास भगवान गोटे यांची चार एकर जिरायती शेती असून त्यांनी आपल्या शेतामध्ये २५  मीटर लांबी व रुंदी तसेच ३ मीटर खोलीचे शेततळे बनविले आहे. पावसाळाच्या सुरुवातीलाच हे शेततळे तुडुंब भरले असून त्यामुळे पावसाच्या खंड काळात हे शेततळे पिकांसाठी वरदान ठरणार आहे. वाशिम-हिंगोली महामार्गलगत तोंडगाव हद्दीमध्ये भानुदास भगवान गोटे यांची चार एकर शेती आहे. मात्र सिंचनाची कोणतीही सुविधा नसल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून त्यांना केवळ सोयाबीन व तूर यासारख्या खरीप पिकांचे उत्पादन घेता येत होते. पावसाच्या भरवशावरच खरीपातील पिकांचे उत्पादन अवलंबून होते. त्यामुळे ज्यावर्षी समाधानकारक पाऊस होईल, त्यावर्षी उत्पदान चांगले व पावसाने दडी मारली तर पीक वाया जाणार,  हे समीकरण ठरलेलेच होते. सन २०१५ मध्येही भानुदास गोटे यांनी सोयाबीन व तूर पेरली होती. मात्र पावसाने खंड दिल्याने व सिंचनाची सुविधा नसल्याने सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याचा परिणाम उत्पादनावर हो

जिल्ह्यात ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकारी नियुक्त

वाशिम , दि . १९ : ध्वनी प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी वाशिम जिल्ह्यात १६ ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यामुळे कोणत्याही ठिकाणी ध्वनी प्रदूषण होत असल्यास याबाबतची माहिती संबंधित प्रदूषण नियंत्रण प्राधिकारी यांना द्यावी, असे वाशिम जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांनी कळविले आहे. ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकारी म्हणून वाशिमचे उपविभागीय पोलीस अधिकारी जयकुमार चक्रे (दूरध्वनी क्र. ०७२५२-२३२५४५, भ्रमणध्वनी क्र. ९८२३४१७९५८), वाशिम शहरचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख (दूरध्वनी क्र. ०७२५२-२३२१००, भ्रमणध्वनी क्र. ९८७०३३६२३७), वाशिम ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर (दूरध्वनी क्र. ०७२५२-२३४१००, भ्रमणध्वनी क्र. ९८२२४१३२११), रिसोडचे पोलीस निरीक्षक पी. एच. डुकरे (दूरध्वनी क्र. ०७२५१-२२२३५६, भ्रमणध्वनी क्र. ९८२३४०००३३), मालेगावचे पोलीस निरीक्षक एस. एच. नाईकनवरे (दूरध्वनी क्र. ०७२५४-२७१२५३, भ्रमणध्वनी क्र. ९९२३२४७९८६), शिरपूरचे पोलीस निरीक्षक हरीष गवळी (दूरध्वनी क्र. ०७२५४-२७४००३, भ्रमणध्वनी क्र. ७७१८९८२५९९), मंगरूळपीरचे प्रभा

जिल्हा परिषद बांधकाम विभागात आपत्ती निवारण कक्षाची स्थापना

वाशिम , दि . १९ : पावसाळ्यामध्ये अतिवृष्टी, पूर व दरड कोसळल्याने किंवा रस्ता, पूल वाहून गेल्याने जिल्हा परिषदेच्या अधिनिस्थ ग्रामीण रस्त्यांवरील वाहतूक खंडित झाल्यास याबाबतची माहिती संकलित करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत आपत्ती निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. अशा प्रकारची स्थिती उद्भवल्यास नागरिकांनी आपत्ती निवारण कक्षाशी संपर्क साधावा, असे वाशिम जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे  कार्यकारी अभियंता यांनी कळविले आहे. आपत्ती निवारण कक्षाचा संपर्क क्रमांक ०७२५२-२३४६६ असा आहे. तसेच संपर्क अधिकारी म्हणून शाखा अभियंता आर. एस. कंकाळे (भ्रमणध्वनी क्र. ९७६७९२७७३१), शाखा अभियंता पी. आर. दुरतकर (भ्रमणध्वनी क्र. ९६५७७२१०९१), व्ही. बी. मिसळ (भ्रमणध्वनी क्र. ८१४९४६९७३७), आर. डी. गेजगे (भ्रमणध्वनी क्र. ८३०८२५८२७४) यांची नियुक्त करण्यात आल्याचे जिल्हा परिषद बांधकाम विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. *****

जिल्ह्यात ३ ऑगस्ट पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

वाशिम , दि . १९ : जिल्ह्यात दिनांक २० जुलै २०१६ ते ०३ ऑगस्ट २०१६ या कालवधीत कलम ३७ (१)(३) नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. या कालावधीत शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येतील अशी शस्त्रे अथवा तीक्ष्ण वस्तू जवळ बाळगणे, दाहक किंवा स्फोटक पदार्थ वाहून नेणे, दगड किंवा क्षेपणास्त्रे सोडायची किंवा फेकायची साधने जवळ बाळगणे, व्यक्तीचे प्रेत अथवा मनुष्याकृती प्रतिमा यांचे बीभत्स प्रदर्शन करणे, जाहीरपणे प्रक्षोभक घोषणा, भाषणे करणे किंवा सुरक्षितता धोक्यात येईल अशी कृती करण्यास मनाई करण्यात आली आहे. अंत्ययात्रा, धार्मिकविधी, सामाजिक सण, लग्न सोहळे यांना हा आदेश लागू नाही, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.       *****

मतदार यादीमध्ये ३१ ऑगस्टपर्यंत नाव नोंदविण्याची संधी - उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे

Image
वाशिम, दि. १८ :- जिल्ह्यात मतदार याद्या शुद्धीकरण मोहीम दिनांक ३१ ऑगस्ट २०१६ पर्यंत राबविली जाणार आहे. त्यामुळे दिनांक १ जानेवारी २०१६ रोजी १८ वर्षे पूर्ण केलेल्या युवक-युवतींना मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्याची संधी मिळणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन आपले नाव मतदार यादीमध्ये नोंदवावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा नगर परिषद निवडणुक प्रक्रीयेचे नोडल अधिकारी सुनील कोरडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये केले. याप्रसंगी वाशिम नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शेट्टे उपस्थित होते. श्री. कोरडे म्हणाले की, जिल्ह्यातील तीनही नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचना व आरक्षण सोडतीची कार्यवाही सुरु आहे. यासोबतच जिल्हाभर मतदार याद्या शुद्धीकरण मोहीम राबविली जात आहे. दिनांक १ जानेवारी २०१६ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या पण मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट नसणाऱ्या नागरिकांची नावे या मोहिमेदरम्यान मतदार याद्यांमध्ये समाविष्ट केली जाणार आहेत. तसेच मतदार ओळखपत्र बनविणे, नावामध्ये दुरुस्ती, मयत अथवा स्थलांतरित व्यक्ती, दुबार नोंद

गरजू शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्ज उपलब्ध करून द्या - किशोर तिवारी

Image
·         खरीप पीक कर्ज वितरणाचा आढावा ·         जिल्हा प्रशासन, बँकांच्या कामगिरीचे कौतुक ·         पंतप्रधान पीक कर्ज मोहिमेत सहभाग वाढविण्याचे आवाहन वाशिम, दि. १८ :- अद्यापही पीक कर्जाचा लाभ न घेतलेल्या पात्र गरजू शेतकऱ्यांना बँकांनी तातडीने पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या खरीप पीक कर्ज आढावा बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, उपविभागीय अधिकारी राजेश पारनाईक, डॉ. शरद जावळे, सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक एस. एस. मेहता, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांच्यासह सर्व तहसीलदार, बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. ना. तिवारी म्हणाले की, वाशिम जिल्ह्यातील बँकांनी खरीप पीक कर्ज वितरणात चांगली कामगिरी केली आहे. मात्र अद्यापही काही बँकांच्या कर्ज वितरणाचे प्रमाण असमाधानकारक आहे. या बँकांनी

शेतमालाची विक्री कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये करा

·         जिल्हा उपनिबंधक यांचे शेतकऱ्यांना आवाहन ·         फळे व भाजीपाला नियमन मुक्त ·         शेतमालावरील आडत खरेदीदाराकडून घेतली जाणार वाशिम , दि . १५ :   कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये फळे व भाजीपाला नियमनमुक्त करण्यात आला असून सर्व प्रकारच्या शेतमालावर शेतकऱ्यांकडून आडत वसुलीस बंदी घालण्यात आली आहे. ही आडत खरेदीदाराकडून वसूल करण्याचा अध्यादेश राज्य शासने दिनांक ५ जुलै २०१६ रोजी निर्गमित केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती व त्या अंतर्गत असलेल्या उपबाजारांमध्ये फळे, भाजीपाला व शेतमाल विक्रीस आणावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, वाशिम यांनी केले आहे. फळे व भाजीपाला नियमनमुक्त करण्यात आला असून सर्व प्रकारच्या शेतमालावर शेतकऱ्यांकडून आडत वसुलीस बंदी घालण्याबाबतचा शासनाच्या अध्यादेशाला राज्यातील व्यापारी व आडते यांनी विरोध दर्शिविला होता. तसेच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील फळे, भाजीपाला व शेतमालाच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद ठेवले होते. त्याअनुषंगाने सर्व व्यापारी व आडते यांनी राज्य शासनाच्या अध्यादेशाची अंमलबज

गटई कामगारांना अनुदानावर मिळणार लोखंडी पत्र्याचे स्टॉल

वाशिम , दि . १४ :   चामड्याच्या वस्तू व पादत्राणे दुरुस्तीच्या क्षेत्रातील अनुसूचित जातीमधील गटई कामगारांना १०० टक्के अनुदान तत्त्वावर लोखंडी पत्र्याचे स्टॉल व  रोख ५०० रुपये अनुदान देण्यात येणार आहे. याकरिता जास्तीत जास्त पात्र व्यक्तींनी विहित नमुन्यातील अर्ज दिनांक २५ जुलै २०१६ पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, वाशिम यांचे कार्यालयात सादर करावेत, असे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त ए. एम. यावलीकर यांनी कळविले आहे. चामड्याच्या वस्तू व पादत्राणे दुरुस्तीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अनुसूचित जातीच्या व्यक्ती आहेत. या व्यावसायिकांना ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण मिळावे, तसेच त्यांची आर्थिक उन्नती व्हावी, यासाठी ग्रामपंचायत, नगरपालिका क्षेत्रात १०० टक्के शासकीय अनुदानावर गटई कामगारांना लोखंडी पत्र्याचे स्टॉल व रुपये ५०० इतके रोख अनुदान देण्याची योजना शासनाने सुरु केली आहे. याकरिता अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी व अनुसूचित जातीमधील असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे ग्रामीण भागात ४० हजार रुपये व शहरी भागात ५० हजार रुपयेपेक्षा जास्त नसावे. याबाब

कंत्राटी वाहन चालकाबाबत निविदा सादर करण्याचे आवाहन

वाशिम , दि . 14  – येथील स्थानिक निधी लेखापरीक्षा कार्यालयाने कंत्राटीपद्धतीने वाहन चालकाबाबत सेवा पुरविणाऱ्या नोंदणीकृत संस्था, बेरोजगार संस्थांकडून निविदा अथवा दरपत्रके मागविली होती. मात्र किमान तीन दरपत्रके तांत्रिक अटींची पूर्तता असणे आवश्यक असताना त्याप्रमाणे या कार्यालयास निविदा अथवा दरपत्रके प्राप्त झाली नाहीत. त्यामुळे पुन्हा कंत्राटीपद्धतीने वाहन चालकाबाबत सेवा पुरविणाऱ्या नोंदणीकृत संस्था, बेरोजगार संस्थांकडून निविदा अथवा दरपत्रके सादर करण्याचे आवाहन सहाय्यक संचालक, स्थानिक निधी लेखापरीक्षा, वाशिम यांनी केले आहे.             इच्छुकांनी दिनांक १९ जुलै २०१६ पर्यंत स्थानिक निधी लेखापरीक्षा कार्यालयात बंद लिफाफ्यामध्ये आपल्या निविदा, दरपत्रके दोन लिफाफा पध्दतीने सादर करावीत. ही दरपत्रके दिनांक २० जुलै २०१६ रोजी दुपारी २ वाजता सहाय्यक संचालक व दरपत्रके सादर करणाऱ्यांच्या समक्ष उघडली जातील. उशिरा प्राप्त झालेली दरपत्रके विचारात घेतली जाणार नाहीत. याबाबतची अधिक माहिती, अटी व शर्ती स्थानिक निधी लेखापरीक्षा कार्यालयाच्या नोटीसबोर्डवर उपलब्ध आहेत, असे सहाय्यक संचालक, स्थानिक न

Few glimpses of #JalYuktShivar works in Washim.

Image

पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा - जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी

·          खरीप हंगामातील नऊ पिकांसाठी योजना लागू ·          ३१ जुलैपर्यंत विमा हप्ता भरणे आवश्यक ·          कर्जदार शेतकऱ्यांना पीक विमा बंधनकारक ·          बिगर कर्जदार शेतकऱ्यांनीही योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन वाशिम , दि . १३ :   खरीप हंगाम २०१६ पासून राज्यात पंतप्रधान पीक विमा योजना लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.   या योजनेमुळे जिल्ह्यातील नऊ पिकांना विमा संरक्षण मिळणार असून नैसर्गिक आपत्ती, किड व रोगामुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना भरपाई देण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले. जिल्ह्यातील खरीप भात, ज्वारी, तूर, मुग, उडीद, भुईमूग, सोयाबीन, तीळ आणि कापूस या पिकांचा पंतप्रधान पीक विमा योजनेत समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यातील कर्जदार शेतकाऱ्यांना पिक विमा बंधनकारक आहे. तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. खातेदारांच्या व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यासाठी पात्र आहेत. शेतकऱ्यांवरील विम्याच्या हप्त

जलसमृद्धीच्या दिशेने वाशिम जिल्ह्याचे पाऊल...

वाशिम जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानअंतर्गत झालेल्या कामांची विहंगम दृश्य...

जिल्हा वार्षिक योजनेतील विकास कामांना गती द्या - पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील

Image
·         जिल्हा वार्षिक योजनेची आढावा बैठक ·         सर्व कामांचा सद्यस्थिती अहवाल सादर करण्याच्या सूचना ·         ग्रामीण भागातील रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवण्याचे निर्देश वाशिम , दि . ०७ : जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून जिल्ह्यात सुरु असलेली सर्व विकास कामे वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. यासाठी संबंधित यंत्रणांनी योग्य ते नियोजन करून कामांना गती द्यावी, असे निर्देश पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष हर्षदा देशमुख, कारंजाचे आमदार राजेंद्र पाटणी, वाशिमचे आमदार लखन मलिक, रिसोडचे आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक ए. एम. यावलीकर यांच्यासह जिल्हा नियोजन समितीचे अशासकीय सदस्य व विविध अंमलबजावणी यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री डॉ. पाटील म्हणाले की, जिल्हा वार्षिक योजनेतून म

‘मागेल त्याला शेततळे’ योजनेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

वाशिम , दि . ०७ : राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘मागेल त्याला शेततळे’ या महत्वकांक्षी योजनेसाठी वाशिम जिल्ह्यातून आजपर्यंत १ हजार ७४६ अर्ज प्राप्त झालेले आहेत. या योजनेसाठी अर्ज सादर करण्यासाठी आता १३ जुलै २०१६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम यांनी कळविले आहे. जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेसाठी अर्ज सादर करावयाचे असतील त्यांनी आपले अर्ज शासनाच्या aaplesarkar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम यांनी केले आहे. *****

थकबाकीदार शेतकऱ्यांना कापसाचे मोफत बियाणे मिळणार

वाशिम , दि . ०७ : सन २०१२-१३ व २०१३-१४ या आर्थिक वर्षांमध्ये पीक कर्ज घेतलेले व चालू वर्षामध्ये थकबाकीदार असलेल्या कापसाची लागवड करण्यास इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून कापसाचे बियाणे मोफत पुरविण्यात येणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम यांनी कळविले आहे. सन २०१२-१३ व २०१३-१४ मध्ये पीक कर्ज घेतले होते, परंतु चालू वर्षी थकबाकीदार असलेल्या ज्या शेतकऱ्यांना कापसाची लागवड करावयाची आहे, मात्र अद्याप लागवड केलेली नाही, अशा शेतकऱ्यांनी संबंधित गावाच्या कृषी सहाय्यकाकडे संपर्क साधावा. त्या शेतकऱ्यांना प्रति शेतकरी प्रति एकर २ बॅग कापूस बियाणे मोफत वाटप करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे व कृषी विभागाकडे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. *****

रेशनिंग दुकानात तूरडाळ उपलब्ध करण्याचा राज्य मंत्रीमंडळाचा निर्णय

केंद्र शासनाकडून मिळालेली तूरडाळ खुल्या बाजारात उपलब्ध करणार                                            -  गिरीष बापट मुंबई ,  दि.  5  : राज्यातील तूरडाळीचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी राज्य मंत्रीमंडळाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत तूरडाळ विकण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे रेशनिंगवर अंत्योदय व बीपीएल शिधापत्रिकाधारकांना  120  रुपये किलो दराने डाळ विकत मिळणार असून राज्यातील सुमारे  70  लाख शिधापत्रिकाधारकांना त्याचा फायदा होणार आहे. याशिवाय केंद्र शासनाकडून राज्याला मिळालेली  700  मेट्रिक टन तूरडाळ खुल्या बाजारात याच दराने विकण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी आज येथे दिली. मंत्रीमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी श्री. बापट बोलत होते. ते म्हणाले की ,  राज्यातील तूरडाळीच्या  वाढत्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य शासनाने कठोर पावले उचलली आहेत. आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे तूरडाळ विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार अंत्योदय अन्न योजनेतील  24  लाख  72  हजार  753 आणि दारिद्र्य रे

निदेशकांना पूर्णवेळ शिक्षकांचा दर्जा देण्याबाबत नव्याने प्रस्ताव सादर करा - राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांचे निर्देश

मुंबई ,  दि.  5 :  उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम व द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रमातील पूर्णवेळ निदेशक या पदाचे नाव बदलून पूर्णवेळ शिक्षक या पदाचा दर्जा देण्याबाबत नव्याने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.            मंत्रालयात डॉ. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संबंधित प्रलंबित मागण्यांबाबत बैठक संपन्न झाली. त्यावेळी डॉ. पाटील यांनी हे निर्देश दिलेत. या बैठकीस कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर ,  विधान परिषदेचे आमदार रामनाथ मोते ,  श्रीकांत देशपांडे ,  व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे प्रभारी संचालक दयानंद मेश्राम यांच्यासह सर्व प्रादेशिक सहसंचालक उपस्थित होते.            व्यवसाय अभ्यासक्रमातील शिक्षक व निदेशकांना प्रथम नियुक्ती दिनांकापासून मान्यता देण्याबाबत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने  10  दिवसांत प्रस्ताव सादर करावेत ,  निदेशक आणि शिक्षकांच्या वेतन श्रेणीबाबत सविस्तर माहिती संबंधित लोकप्रतिनिधींना उपलब्ध करुन द्यावी

अंत्योदय व बीपीएल शिधापत्रिकाधारकांना मिळणार दरमहा एक किलो तूरडाळ

             राज्यात तूर डाळीचे दर वाढत असल्यामुळे सर्वसामान्य जनतेस दिलासा देण्याच्या दृष्टीने राज्यातील अंत्योदय अन्न योजना व बीपीएल मधील शिधापत्रिकाधारकांना  प्रतिशिधापत्रिका प्रतिमाह १ किलो तूरडाळ १२० रूपये किलो  दराने वितरित करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्याचा लाभ राज्यातील  70  लाख  7  हजार  589  शिधापत्रिकाधारकांना होणार आहे.              गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तूर डाळीचे दर वाढत आहेत. त्याचा सर्वसामान्य जनतेला भार सहन करावा लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना तूरडाळ रास्त भावात उपलब्ध व्हावी ,  यासाठी राज्य शासनाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत तूरडाळ वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार अंत्योदय अन्न योजनेतील  24  लाख  72  हजार  753  आणि बीपीएल मधील  45  लाख  ३४  हजार  836  शिधापत्रिकाधारकांना प्रतिमाह १२० रूपये  किलो दराने एक किलो तूरडाळ ऑगस्ट ते ऑक्टोबर  2016  या कालावधीत वितरित केली जाणार आहे. ही तूरडाळ एनसीडीईएक्स स्पॉट एक्स्जेंजमार्फत खरेदी करण्यात येणार असून त्यासाठी  84.74 कोटी रूपयांच्या भांडवली खर्चास मान्यता देण

नागपूर-मुंबई दरम्यान महाराष्ट्र समृद्धी महामार्ग

शेतकऱ्यांकडून लँड पुलिंग योजनेद्वारे पूर्वसंमतीने भागीदारी पद्धतीने जमिनी घेणार              राज्याच्या परिवहनात क्रांती घडविणारा नागपूर-मुंबई शीघ्रसंचार द्रुतगती मार्ग ,  त्याचे जोडरस्ते व त्यावरील प्रस्तावित नवनगरांच्या उभारणीसाठी आवश्यक असणाऱ्या जमिनी शेतकऱ्यांकडून लँड पुलिंग योजनेद्वारे पूर्वसंमती घेऊन भागीदारी पद्धतीने प्राप्त करून घेण्याच्या निर्णयास आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात तत्वत: मान्यता देण्यात आली. या मार्गाचे नामकरण महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असे करण्यासह या मार्गावर उभारण्यात येणारी  24  प्रस्तावित नवनगरे ही कृषी समृद्धी केंद्रे म्हणून ओळखली जाणार आहेत.              देशाची आर्थिक व वाणिज्यिक राजधानी असणाऱ्या मुंबई महानगरातून प्रमुख राष्ट्रीय महामार्गाद्वारे देशांतर्गत मोठ्या प्रमाणात भूपृष्ठ वाहतूक होते. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरला मुंबई महानगराशी जोडणाऱ्या शीघ्रसंचार द्रुतगती मार्गामुळे राज्याचा संतुलित व समतोल विकास होण्यास मदत होणार आहे. त्यादृष्टीने भूसंपादनाची कामे जलद गतीने होण्यासाठी आजचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.              हा म