पदवीधर अंशकालीन उमेदवारांचा ‘डाटा-बेस’ होणार अद्ययावत

राज्यातील पदवीधर अंशकालीन उमेदवारांचा डाटा-बेस अद्ययावत करावयाचा आहे. याकरिता वाशिम जिल्ह्यातील पदवीधर अंशकालीन उमेदवारांनी दिनांक ४ जुलै २०१६ ते दिनांक ८ जुलै २०१६ या कालावधीत आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथे उपस्थित रहावे, असे या केंद्राचे सहाय्यक संचालक वि. कृ. माळी यांनी कळविले आहे.
पदवीधर अंशकालीन म्हणून ३ वर्षे काम केल्याचे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेल्या प्रमाणपत्रांच्या दोन झेरोक्स प्रती. अंशकालीन उमेदवार म्हणून नोंद केलेले अद्ययावत सेवायोजन कार्डाच्या दोन झेरोक्स प्रती, पासपोर्ट आकाराचे अलीकडील दोन फोटो, कार्यालयाकडून पुरविण्यात येणारे शपतपत्र दोन प्रतीत आदी कागदपत्रांसह पदवीधर अंशकालीन उमेदवारांनी दिनांक ४ जुलै २०१६ ते दिनांक ८ जुलै २०१६ या कालावधीत आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथे उपस्थित रहावे. ज्या अंशकालीन उमेदवारांची अंशकालीन उमेदवार म्हणून सेवायोजन कार्डमध्ये (एम्प्लॉयमेंट कार्ड) नोंद नाही, त्यांनी पदवीधर अंशकालीन उमेदवार म्हणून काम केल्याचे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेल्या प्रमाणपत्राची झेरोक्स प्रत (तीन वर्षे कालावधीसह) जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात उपलब्ध करून दिल्यास संबंधित उमेदवारांची अंशकालीन उमेदवार म्हणून नोंद करून घेता येईल.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे