जिल्ह्यात ३ ऑगस्ट पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू
वाशिम, दि. १९ : जिल्ह्यात दिनांक २० जुलै २०१६ ते ०३ ऑगस्ट २०१६ या कालवधीत कलम ३७ (१)(३)
नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
या कालावधीत शारीरिक इजा
करण्यासाठी वापरता येतील अशी शस्त्रे अथवा तीक्ष्ण वस्तू जवळ बाळगणे, दाहक किंवा
स्फोटक पदार्थ वाहून नेणे, दगड किंवा क्षेपणास्त्रे सोडायची किंवा फेकायची साधने
जवळ बाळगणे, व्यक्तीचे प्रेत अथवा मनुष्याकृती प्रतिमा यांचे बीभत्स प्रदर्शन
करणे, जाहीरपणे प्रक्षोभक घोषणा, भाषणे करणे किंवा सुरक्षितता धोक्यात येईल अशी
कृती करण्यास मनाई करण्यात आली आहे. अंत्ययात्रा, धार्मिकविधी, सामाजिक सण, लग्न
सोहळे यांना हा आदेश लागू नाही, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.
*****
Comments
Post a Comment