कंत्राटी वाहन चालकाबाबत निविदा सादर करण्याचे आवाहन
वाशिम, दि. 14 – येथील स्थानिक निधी लेखापरीक्षा कार्यालयाने
कंत्राटीपद्धतीने वाहन चालकाबाबत सेवा पुरविणाऱ्या नोंदणीकृत संस्था, बेरोजगार
संस्थांकडून निविदा अथवा दरपत्रके मागविली होती. मात्र किमान तीन दरपत्रके
तांत्रिक अटींची पूर्तता असणे आवश्यक असताना त्याप्रमाणे या कार्यालयास निविदा
अथवा दरपत्रके प्राप्त झाली नाहीत. त्यामुळे पुन्हा कंत्राटीपद्धतीने वाहन
चालकाबाबत सेवा पुरविणाऱ्या नोंदणीकृत संस्था, बेरोजगार संस्थांकडून निविदा अथवा
दरपत्रके सादर करण्याचे आवाहन सहाय्यक संचालक, स्थानिक निधी लेखापरीक्षा, वाशिम
यांनी केले आहे.
इच्छुकांनी दिनांक १९ जुलै २०१६ पर्यंत
स्थानिक निधी लेखापरीक्षा कार्यालयात बंद लिफाफ्यामध्ये आपल्या निविदा, दरपत्रके
दोन लिफाफा पध्दतीने सादर करावीत. ही दरपत्रके दिनांक २० जुलै २०१६ रोजी दुपारी २
वाजता सहाय्यक संचालक व दरपत्रके सादर करणाऱ्यांच्या समक्ष उघडली जातील. उशिरा
प्राप्त झालेली दरपत्रके विचारात घेतली जाणार नाहीत. याबाबतची अधिक माहिती, अटी व शर्ती
स्थानिक निधी लेखापरीक्षा कार्यालयाच्या नोटीसबोर्डवर उपलब्ध आहेत, असे सहाय्यक
संचालक, स्थानिक निधी लेखापरीक्षा, वाशिम यांनी कळविले आहे.
*****
Comments
Post a Comment