थकबाकीदार शेतकऱ्यांना कापसाचे मोफत बियाणे मिळणार
वाशिम, दि. ०७ : सन २०१२-१३ व २०१३-१४ या आर्थिक वर्षांमध्ये पीक कर्ज घेतलेले व चालू
वर्षामध्ये थकबाकीदार असलेल्या कापसाची लागवड करण्यास इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांना
विशेष बाब म्हणून कापसाचे बियाणे मोफत पुरविण्यात येणार असल्याचे जिल्हा अधीक्षक
कृषी अधिकारी, वाशिम यांनी कळविले आहे.
सन
२०१२-१३ व २०१३-१४ मध्ये पीक कर्ज घेतले होते, परंतु चालू वर्षी थकबाकीदार असलेल्या
ज्या शेतकऱ्यांना कापसाची लागवड करावयाची आहे, मात्र अद्याप लागवड केलेली नाही,
अशा शेतकऱ्यांनी संबंधित गावाच्या कृषी सहाय्यकाकडे संपर्क साधावा. त्या शेतकऱ्यांना
प्रति शेतकरी प्रति एकर २ बॅग कापूस बियाणे मोफत वाटप करण्यात येणार आहे. अधिक
माहितीसाठी इच्छुकांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे व कृषी विभागाकडे
संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम यांनी प्रसिद्धी
पत्रकाद्वारे केले आहे.
*****
Comments
Post a Comment