विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !
· वक्तृत्व स्पर्धा, परिसंवादात मांडले विचार · ‘स्वीप’ अंतर्गत उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद · सुमारे १८ हजार विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग वाशिम , दि. १२ : ‘ मतदान हा आपल्याला मिळालेला बहुमूल्य अधिकार आहे , आपलं मत वाया घालवू नका , कोणतेही कारण न देता २१ ऑक्टोंबरला मतदान करा... ’ ‘ मतदान करताना जाती-धर्माचा विचार न करता योग्य उमेदवार निवडा... ’ ‘ आपलं मत विकू नका , प्रत्येक मत लोकशाहीची ताकद आहे , ते वाया घालवू नका... ’ असे विचार व्यक्त करून शालेय विद्यार्थ्यांनी मतदान आणि लोकशाही प्रक्रियेचे महत्व पटवून दिले. निमित्त होते जिल्हा निवडणूक यंत्रणेमार्फत ‘ स्वीप ’ अंतर्गत आयोजित वक्तृत्व स्पर्धा आणि परिसंवादाचे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा ‘ स्वीप ’ चे नोडल अधिकारी दीपक कुमार मीना यांच्या मार्गदर्शनात शुक्रवारी जिल्ह्यातील शाळांमध्ये वक्तृत्व स्पर्धा आणि परिसंवाद आयोज...
Comments
Post a Comment