जिल्हा वार्षिक नियोजन समिती बैठकीच्या पूर्वतयारीचा आढावा

वाशिम, दि. ०४  जिल्हा वार्षिक नियोजन समितीची बैठक दिनांक ७ जुलै २०१६ रोजी गृह राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीच्या पूर्वतयारीचा आज जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आढावा घेतला.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, अपर जिल्हाधिकारी बी. के. इंगळे, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक ए. एम. यावलीकर, उपविभागीय अधिकारी डॉ. संदीपान सानप, डॉ. शरद जावळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक के. एम. अहमद, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता के. आर. गाडेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी जिल्हा वार्षिक नियोजन समितीची बैठकच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. तसेच सर्व अधिकाऱ्यांनी आपल्या विभागांशी संबंधित परिपूर्ण माहिती व कागदपत्रांसह बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना केल्या.

*****

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे