जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये १२ तक्रारी निकाली

वाशिम, दि. ०४ : जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये विविध विभागाच्या १२ तक्रारी निकाली काढण्यात आल्या. तसेच एक तक्रार नव्याने दाखल करून घेण्यात आली आहे.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, अपर जिल्हाधिकारी बी. के. इंगळे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी ए. आर. खंडागळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी के. एम. अहमद, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता के. आर. गाडेकर, उपविभागीय अधिकारी डॉ. संदीपान सानप, डॉ. शरद जावळे यांच्यासह इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
निकाली निघालेल्या तक्रारीमध्ये भूसंपादन विभागाच्या १, रोहयोच्या १, मालेगाव, रिसोड व कारंजाचे तहसीलदार यांच्या प्रत्येकी १, जिल्हा परिषदेच्या ५, महावितरण १ व वाशिम नगर परिषदेच्या १ तक्रारींचा समावेश आहे.

******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश