जिल्ह्यात ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकारी नियुक्त

वाशिम, दि. १९ : ध्वनी प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी वाशिम जिल्ह्यात १६ ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यामुळे कोणत्याही ठिकाणी ध्वनी प्रदूषण होत असल्यास याबाबतची माहिती संबंधित प्रदूषण नियंत्रण प्राधिकारी यांना द्यावी, असे वाशिम जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांनी कळविले आहे.
ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकारी म्हणून वाशिमचे उपविभागीय पोलीस अधिकारी जयकुमार चक्रे (दूरध्वनी क्र. ०७२५२-२३२५४५, भ्रमणध्वनी क्र. ९८२३४१७९५८), वाशिम शहरचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख (दूरध्वनी क्र. ०७२५२-२३२१००, भ्रमणध्वनी क्र. ९८७०३३६२३७), वाशिम ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर (दूरध्वनी क्र. ०७२५२-२३४१००, भ्रमणध्वनी क्र. ९८२२४१३२११), रिसोडचे पोलीस निरीक्षक पी. एच. डुकरे (दूरध्वनी क्र. ०७२५१-२२२३५६, भ्रमणध्वनी क्र. ९८२३४०००३३), मालेगावचे पोलीस निरीक्षक एस. एच. नाईकनवरे (दूरध्वनी क्र. ०७२५४-२७१२५३, भ्रमणध्वनी क्र. ९९२३२४७९८६), शिरपूरचे पोलीस निरीक्षक हरीष गवळी (दूरध्वनी क्र. ०७२५४-२७४००३, भ्रमणध्वनी क्र. ७७१८९८२५९९), मंगरूळपीरचे प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले (दूरध्वनी क्र. ०७२५३-२६०६६२, भ्रमणध्वनी क्र. ९८२२२९१२९५), मंगरूळपीरचे पोलीस निरीक्षक आर. बी. जायभाये (दूरध्वनी क्र. ०७२५३-२६०३३३, भ्रमणध्वनी क्र. ९८२३११७७८१), अनसिंगच्या पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता भारद्वाज (दूरध्वनी क्र. ०७२५२-२२६०३४, भ्रमणध्वनी क्र. ९८७५४४४८००), आसेगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक जाधव (दूरध्वनी क्र. ०७२५३-२३५५५८, भ्रमणध्वनी क्र. ९९२२४१३२११), जऊळकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. जी. शेख (दूरध्वनी क्र. ०७२५४-२७२०१६), भ्रमणध्वनी क्र. ८४११९३७११०), कारंजाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले (दूरध्वनी क्र. ०७२५६-२२२००८, भ्रमणध्वनी क्र. ९८२२२९१२९५), कारंजा शहरचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील (दूरध्वनी क्र. ०७२५६-२२२१००, भ्रमणध्वनी क्र. ९८२३६८४६६०), कारंजा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक शिवाजी घुगे (दूरध्वनी क्र. ०७२५६-२२२४००, भ्रमणध्वनी क्र. ९८२३१५७०५१), मानोराचे पोलीस निरीक्षक पी. व्ही. नाचनकर (दूरध्वनी क्र. ०७२५३-२३३२२९, भ्रमणध्वनी क्र. ९१५८९९५२४९), धनजचे पोलीस निरीक्षक राहुल आठवले (दूरध्वनी क्र. ०७२५६-२३२०३०, भ्रमणध्वनी क्र. ९९२३४०३७३१) या पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ध्वनी प्रदूषण तक्रारीकरिता नागरिक पोलीस नियंत्रण कक्षाचा क्रमांक १०० या क्रमांकावरही संपर्क करू शकतात. तसेच ८६०५८७८२५४, ८६०५१२६८५७ या क्रमांकावर एसएमएस अथवा sp.washim@mahapolice.gov.in या ई-मेलवर संदेश पाठवू शकतात, असे वाशिम जिल्हा पोलीस दलामार्फत कळविण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे