निदेशकांना पूर्णवेळ शिक्षकांचा दर्जा देण्याबाबत नव्याने प्रस्ताव सादर करा - राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांचे निर्देश


मुंबईदि. 5 : उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम व द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रमातील पूर्णवेळ निदेशक या पदाचे नाव बदलून पूर्णवेळ शिक्षक या पदाचा दर्जा देण्याबाबत नव्याने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
          मंत्रालयात डॉ. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संबंधित प्रलंबित मागण्यांबाबत बैठक संपन्न झाली. त्यावेळी डॉ. पाटील यांनी हे निर्देश दिलेत. या बैठकीस कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूरविधान परिषदेचे आमदार रामनाथ मोतेश्रीकांत देशपांडेव्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे प्रभारी संचालक दयानंद मेश्राम यांच्यासह सर्व प्रादेशिक सहसंचालक उपस्थित होते.
          व्यवसाय अभ्यासक्रमातील शिक्षक व निदेशकांना प्रथम नियुक्ती दिनांकापासून मान्यता देण्याबाबत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने 10 दिवसांत प्रस्ताव सादर करावेतनिदेशक आणि शिक्षकांच्या वेतन श्रेणीबाबत सविस्तर माहिती संबंधित लोकप्रतिनिधींना उपलब्ध करुन द्यावीअसे निर्देश ही डॉ. पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले. त्याचबरोबर संचालनालयांतर्गत येणाऱ्या नियमित सर्व कर्मचाऱ्यांचे पगार महिन्याच्या 1तारखेला व्हावे याविषयी तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश डॉ. पाटील यांनी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या प्रधान सचिवांना दिले.
गुणात्मक शिक्षणावर भर द्या
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना व प्रमोद महाजन कौशल्य विकास योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या स्वंयसेवी संस्थांनी विद्यार्थ्यांच्या गुणात्मक शिक्षणावर भर द्यावा तसेच फक्त प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र देऊन चालणार नाही तर विद्यार्थ्यांमध्ये खऱ्या अर्थाने कौशल्य विकसित करावे. तसेच कौशल्य विकासाची चळवळ राज्यभरात व्यापक स्वरुपात पुढे न्यावी. त्याबरोबरच प्रशिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी शासन मान्य प्रमाणपत्र देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहेअसे डॉ. रणजित पाटील यांनी सांगितले.
0000

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे