‘मागेल त्याला शेततळे’ योजनेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
वाशिम, दि. ०७ : राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘मागेल त्याला शेततळे’ या महत्वकांक्षी
योजनेसाठी वाशिम जिल्ह्यातून आजपर्यंत १ हजार ७४६ अर्ज प्राप्त झालेले आहेत. या
योजनेसाठी अर्ज सादर करण्यासाठी आता १३ जुलै २०१६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली
असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम यांनी कळविले आहे.
जिल्ह्यातील
ज्या शेतकऱ्यांना ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेसाठी अर्ज सादर करावयाचे असतील
त्यांनी आपले अर्ज शासनाच्या aaplesarkar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सादर
करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम यांनी केले आहे.
*****
Comments
Post a Comment