जिल्हा परिषद बांधकाम विभागात आपत्ती निवारण कक्षाची स्थापना
वाशिम, दि. १९ : पावसाळ्यामध्ये अतिवृष्टी, पूर व दरड कोसळल्याने किंवा रस्ता, पूल वाहून
गेल्याने जिल्हा परिषदेच्या अधिनिस्थ ग्रामीण रस्त्यांवरील वाहतूक खंडित झाल्यास
याबाबतची माहिती संकलित करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत आपत्ती
निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. अशा प्रकारची स्थिती उद्भवल्यास नागरिकांनी
आपत्ती निवारण कक्षाशी संपर्क साधावा, असे वाशिम जिल्हा परिषदेच्या बांधकाम
विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी कळविले
आहे.
आपत्ती निवारण कक्षाचा
संपर्क क्रमांक ०७२५२-२३४६६ असा आहे. तसेच संपर्क अधिकारी म्हणून शाखा अभियंता आर.
एस. कंकाळे (भ्रमणध्वनी क्र. ९७६७९२७७३१), शाखा अभियंता पी. आर. दुरतकर
(भ्रमणध्वनी क्र. ९६५७७२१०९१), व्ही. बी. मिसळ (भ्रमणध्वनी क्र. ८१४९४६९७३७), आर.
डी. गेजगे (भ्रमणध्वनी क्र. ८३०८२५८२७४) यांची नियुक्त करण्यात आल्याचे जिल्हा
परिषद बांधकाम विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
*****
Comments
Post a Comment