Posts

Showing posts from June, 2017

वृक्ष लागवड, संवर्धनासाठी पुढाकार घ्या - जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी

Image
·         ४ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम पूर्वतयारी आढावा ·         प्रत्येक व्यक्तीने एक तरी झाड लावण्याचे आवाहन ·         सात दिवस चालणार वृक्ष लागवड महोत्सव वाशिम , दि . ३० : वृक्षांचे प्रमाण कमी होत असल्याने पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. त्यामुळे शासनामार्फत ५० कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत यावर्षी राज्यात ४ कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. त्यानुसार वाशिम जिल्ह्याला ५ लाख ८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून प्रशासनाने उद्दिष्टापेक्षा जास्त म्हणजेच ५ लाख २२ हजार वृक्ष लागवडीचे नियोजन केले आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील नागरिक, स्वयंसेवी संस्थानीही पुढाकार घेऊन वृक्ष लागवड व त्यांचे संवर्धन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज केले. ४ कोटी वृक्ष लागवड मोहिमेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, मंगरूळपीरचे उपविभागीय अधिकारी राजेश पारनाईक, कारंजाचे उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, विभागीय वन अधिकारी के. आर. राठोड, सहाय्य

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश

Image
·          ४ कोटी वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन ·          अभंग, भारूडातून वृक्षारोपणाविषयी जनजागृती वाशिम , दि . २९ :   राज्य शासनामार्फत ४ कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत दि. १ ते ७ जुलै २०१७ या कालावधीत वृक्षारोपण करण्यात येणार आहे. सर्वसामान्य नागरिकांमध्ये वृक्ष लागवड व संवर्धनाविषयी जनजगृती करून त्यांना वृक्षलागवड मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यासाठी आज जिल्हा प्रशासनाच्यावतीने वृक्ष दिंडी काढण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून वृक्ष दिंडीला सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती विश्वनाथ सानप, अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कापडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बाळासाहेब बोराडे, सामाजिक वनीकरणचे विभागीय वन अधिकारी के. आर. राठोड, प्रादेशिक वन अधिकारी

पोहरादेवी विकास आराखड्याच्या अनुषंगाने पालकमंत्री संजय राठोड यांनी घेतला आढावा

Image
·          २९ जून रोजी उच्चस्तरीय समितीसमोर सादरीकरण वाशिम, दि. २५ :  पोहरादेवी विकास आराखड्याविषयी शासनाच्या उच्चस्तरीय समितीसमोर होणाऱ्या सादरीकारणाच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या पूर्वतयारीचा आज पालकमंत्री संजय राठोड यांनी आढावा घेतला. तसेच या आराखड्यामध्ये प्रस्तावित विकास कामांचे परिपूर्ण सादरीकरण होईल, याची खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या. यावेळी खासदार भावना गवळी, मंगरूळपीरचे उपविभागीय अधिकारी राजेश पारनाईक, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कोपर्डे, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता के. आर. गाडेकर,  सहाय्यक वनसंरक्षक आर. बी. गवई, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता निलेश राठोड, आर्किटेक्ट हबीब खान, डॉ. शाम जाधव आदी उपस्थित होते.  पोहरादेवी विकास आराखड्याला अंतिम मंजुरी देण्याच्या अनुषंगाने दि. २९ जून २०१७ रोजी मुंबई येथे मुख्य सचिव सुमित मल्लिक यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये पोहरादेवी येथे पहिल्या टप्प्यात २५ कोटी रुपये निधीतून होणाऱ्या विकास कामांविषय

पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत ८६ तक्रारींचे निवारण

Image
·         मंगरूळपीर उपविभागस्तरीय विस्तारित समाधान शिबीर ·         खचलेल्या विहिरींचे प्रश्न त्वरित निकाली काढण्याचे निर्देश ·         अर्धन्यायिक प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्याच्या सूचना वाशिम, दि. २५ : नागरिकांच्या प्रलंबित तक्रारींचा निपटारा करण्यासाठी पालकमंत्री संजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मंगरूळपीर येथे आयोजित करण्यात आलेल्या उपविभागस्तरीय विस्तारित समाधान शिबिरात ८६ तक्रारींचे निवारण करण्यात आले. पालकमंत्री ना. राठोड यांनी सर्व तक्रारदारांशी व्यक्तीशः संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे समाधान केले. यावेळी खासदार भावनाताई गवळी, मंगरूळपीरच्या नगराध्यक्ष डॉ. गजाला खान, पंचायत समिती सभापती निलिमा देशमुख, जिल्हा परिषद कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विश्वनाथ सानप, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल खंडागळे, मंगरूळपीरचे उपविभागीय अधिकारी राजेश पारनाईक, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी, सार्व

समाधान शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना त्वरित न्याय देण्याचा प्रयत्न - पालकमंत्री संजय राठोड

Image
·         कारंजा येथील समाधान शिबिरात ४४४ अर्जांवर सुनावणी ·         दप्तर दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना ·         रस्ते विषयक प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्याचे निर्देश वाशिम, दि. २२ : सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा करण्यासाठी महाराजस्व अभियानअंतर्गत विस्तारित समाधान शिबिरांचे प्रत्येक उपविभाग स्तरावर आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये नागरिकांना त्वरित न्याय मिळण्यास मदत होईल, असे मत महसूल राज्यमंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केले. कारंजा येथे बाबासाहेब धाबेकर सभागृहात आयोजित कारंजा उपविभागस्तरीय समाधान शिबिरात ते बोलत होते. यावेळी खासदार भावनाताई गवळी, आमदार राजेंद्र पाटणी, कारंजाचे नगराध्यक्ष शेषराव ढोके, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, अपर जिल्हा पोलीस अधीक्षक स्वप्ना गोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. बी. पटेल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल खंडागळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क