Posts

Showing posts from May, 2018

शेतकऱ्यांना मागणीनुसार प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करा - जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा

Image
• ‘आत्मा’ नियामक मंडळाची आढावा सभा • सेंद्रिय उत्पादनांच्या विक्रीसाठी प्रयत्न करण्याच्या सूचना वाशिम, दि. ३१ : शेतकरी गटामध्ये सहभागी असलेल्या शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन तसेच त्यांच्या मागणीनुसार त्यांना प्रशिक्षण, अभ्यास दौरा, प्रात्यक्षिक व शेतीशाळा आदी सोयी उपलब्ध करून देण्यासाठी ‘आत्मा’च्या माध्यमातून प्रयत्न करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)चे अध्यक्ष लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आज झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात झालेल्या या बैठकीला जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, जिल्हाउपनिबंधक रमेश कटके, ‘नाबार्ड’चे जिल्हा विकास प्रबंधक विजय खंडरे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय नगराळे, आत्माच्या प्रकल्प संचालक अनिसा महाबळे, अशासकीय सदस्य गोपाळराव लुंगे, विठ्ठलराव आरु आदी उपस्थित होते. सर्वप्रथम दिवंगत कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांना आदरांजली वाहून सभेला सुरुवात करण्यात आली. जिल्हाधिकारी श्री. मिश्रा

स्वयंसेवी संस्थांनी वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी व्हावे - जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा

Image
वाशिम ,   दि .   २९ :   जिल्ह्यात वृक्षांची संख्या अतिशय कमी आहे. पर्यावरणाच्या संतुलनासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड होणे आवश्यक आहे. याकरिता राज्य शासनामार्फत दि. १ जुलै ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या १३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेत सर्वसामान्य नागरिक व स्वयंसेवी संस्थांनी सहभागी होऊन जिल्ह्यात जास्तीत जास्त वृक्ष लागवड व वृक्ष संगोपन करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आज केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आयोजित वृक्ष लागवड मोहीम पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, उप वन संरक्षक श्री. वळवी, रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय अधिकारी के. आर. राठोड, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कापडे यांच्यासह संबंधित विभागाचे प्रमुख, विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. मिश्रा म्हणाले, वाशिम जिल्ह्याला १२ लक्ष ८४ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्

पीक कर्जविषयक तक्रारींचे निराकरण करण्यासाठी प्रत्येक बँकेने तक्रार निवारण अधिकाऱ्यांची नेमणूक करावी - जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा

Image
·          बँक अधिकाऱ्यांच्या बैठकीत पीक कर्ज वाटपाचा आढावा ·          ५० हजार रुपयेपर्यंतच्या कर्जाला नो-ड्युजची गरज नाही ·          प्रत्येक पात्र शेतकऱ्याला स्केल ऑफ फायनान्सनुसार कर्ज द्या वाशिम ,   दि .   २९ :   शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळवताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी तसेच त्यांच्या पीक कर्जविषयक तक्रारींचे निराकरण तातडीने होण्यासाठी सर्व बँक शाखांमध्ये तक्रारी निवारण अधिकाऱ्यांची नियुक्त करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आज झालेल्या आढावा बैठकीत दिल्या. आतापर्यंत झालेल्या पीक कर्ज वाटपाचा आढावा घेण्यासाठी तसेच शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा उपनिबंधक रमेश कटके, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय नगराळे, ‘नाबार्ड’चे विकास प्रबंधक विजय खंडरे यांच्यासह विविध बँकाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. मिश्रा म्हणाले, शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाची कार्यवाही गतिमान करण्याच्या सूचना देऊनही यास

कर्जमाफीसाठी अर्ज सादर करण्यास ५ जून पर्यंत मुदतवाढ

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना ·         योजनेची व्याप्ती वाढली; ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक वाशिम , दि . २६ : राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली असून आता सन २००१ ते २००९ या कालावधीतील कर्ज थकीत असलेल्या मात्र सन २००८ व २००९ मधील कर्जमाफी योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकरी खातेदारांनाही कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. तसेच इमूपालन, शेडनेट, पॉलिहाऊससाठी २००१ ते २०१६ या कालावधीत घेतलेल्या थकीत राहिलेल्या कर्जाचा समावेशही या योजनेत करण्यात आला आहे. कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी दि. ५ जून २०१८ पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक असल्याचे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. कर्जमाफी योजनेत दि. १   एप्रिल २००१ ते दि. ३१ मार्च २००९ पर्यंत उचल केलेल्या पीक कर्ज किंवा मध्यम मुदत कर्जाची दि. ३० जून २०१६ रोजी थकीत रकमेतून परतफेड केलेली रक्कम वगळून दि. ३१ जुलै २०१७ पर्यंत पीक कर्ज, पुनर्गठन केलेले व मध्यम मुदतीचे मुद्दल व व्याजासह एकूण दीड लाख रुपयांपर्यंतच

कृषि विभागाच्या शिपाई, चौकीदार भरतीसाठी जमा केलेले परीक्षा शुल्क परत मिळणार

·         दि. ३१ मे पर्यंत आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन वाशिम , दि . २६ : अमरावती विभागीय कृषि सहसंचालक कार्यालयाने शिपाई, चौकीदार पदाची भरती प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने घेण्याकरिता दि. २४ डिसेंबर २०१३ रोजी जाहिरात दिली होती. ही भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली असून ज्या उमेदवारांनी या पदांसाठी आवेदन पत्र सादर केले व त्याबरोबर परीक्षा शुल्क डीडीद्वारे जिल्हा अधीक्षक कृषि कार्यालयास जमा केले होते, त्या उमेदवारांचे परीक्षा शुल्क संबंधितांना परत केले जाणार आहे. याकरिता संबंधित उमेदवारांनी रक्कम भरल्याची पावती व फॉर्म, उमेदवाराचा बँक खाते क्रमांक, बँकेचा आयएफएससी कोड, उमेदवाराचे ओळखपत्र व बँक पासबुकची पहिल्या पानाची सुस्पष्ट छायांकित प्रत दि. ३१ मे २०१८ पर्यंत वाशिम जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयात जमा करावी. वरील माहिती व कागदपत्रे विहित कालावधीत जमा न केल्यास परीक्षा शुल्काची रक्कम मिळणार नाही, असे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

सोयाबीन अनुदानासाठी बँक खात्याची अचूक माहिती सादर करा

·         अचूक माहिती सादर करण्यासाठी चार दिवसांचा कालावधी वाशिम , दि . २६ : ऑक्टोंबर २०१६ ते डिसेंबर २०१६ या कालावधीत कृषि उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीन विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल २०० रुपये अनुदान प्रति शेतकरी २५ क्विंटल या मर्यादेत देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यानुसार वाशिम जिल्ह्यातील ४४ हजार ६१८ शेतकऱ्यांना १४ कोटी ७९ लक्ष १३ हजार ५९४ रुपये अनुदान मंजूर झाले होते. यापैकी ४१ हजार ४६१ शेतकऱ्यांचे अनुदान संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले आहे. मात्र बँक खाते क्रमांक चुकीचे असल्याने अद्यापही जिल्ह्यातील ३ हजार २४३ शेतकऱ्यांचे अनुदान जमा करणे बाकी आहे. तरी संबंधित शेतकऱ्यांनी चार दिवसांत संबंधित कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये संपर्क साधून आपल्या बँक खात्याची अचूक माहिती सादर करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था रमेश कटके यांनी केले आहे. चुकीचे बँक खाते असलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या संबंधित कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये लावण्यात आल्या आहेत. हे खाते क्रमांक दुरुस्त करण्याच्या सूचना सर्व कृषि उत्पन्न बाजार समित्यांना यापूर्वीच द

कृषि, आरोग्य व शिक्षण क्षेत्राच्या विकासाला प्राधान्य द्या - पालक सचिव नंद कुमार

Image
·         ‘ट्रान्सपोर्टफॉर्मिंग अॅस्पिरिशनल डिस्ट्रिक्टस्’ उपक्रमाविषयी आढावा वाशिम , दि . २५ : जिल्ह्यातील नागरिकांचे जीवनमान उंचाविण्याच्या दृष्टीने व जिल्ह्याचा विकास साधण्यासाठी नीती आयोगाच्यामाध्यमातून ‘ट्रान्सपोर्टफॉर्मिंग अॅस्पिरिशनल डिस्ट्रिक्टस्’ उपक्रमांतर्गत प्रयत्न केले जात आहेत. या अंतर्गत कृषि, आरोग्य व शिक्षण क्षेत्राच्या विकासाला विशेष प्राधान्य देऊन संबंधित विभागांनी त्यादृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्ह्याचे पालक सचिव तथा राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव नंद कुमार यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आयोजित ‘ट्रान्सपोर्टफॉर्मिंग अॅस्पिरिशनल डिस्ट्रिक्टस्’   विषयीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अरुण राऊत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कापडे, सुदाम इस्कापे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, जिल्हा उपनिबंधक रमेश कटके, जिल्हा अग्रणी बँ

जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांना गती द्या - विभागीय आयुक्त पियुष सिंह

Image
·         सन २०१७-१८ मधील सर्व प्रस्तावित कामे १५ जूनपर्यंत पूर्ण करा ·         मागेल त्याला शेततळे, नरेगामधील कामांचाही आढावा ·         सर्व कामांचे जिओ टॅगिंग करण्याच्या सूचना वाशिम , दि . २४  : जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत सन २०१७-१८ मध्ये निवडण्यात आलेल्या गावांमधील प्रस्तावित कामे १५ जून २०१८ पर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे. याकरिता या कामांना गती देण्याच्या सूचना विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत दिल्या. या बैठकीत मागेल त्याला शेततळे, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांचाही आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, रोहयो उपायुक्त शहाजी पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, उप वन संरक्षक श्री. वळवी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय अधिकारी के. आर. राठोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने, सार

१३ कोटी वृक्ष लागवड मोहीम पूर्वतयारीचा विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी घेतला आढावा

Image
·         वृक्ष लागवड उद्दिष्ट पूर्तीसाठी सर्व यंत्रणांचा सहभाग आवश्यक ·         स्वयंसेवी संस्थांनाही मोहिमेत सहभागी करून घेण्याच्या सूचना वाशिम , दि . २४ : राज्य शासनाच्या ५० कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत येत्या १ जुलै ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत राज्यात १३ कोटी वृक्ष लागवड मोहीम राबविली जाणार आहे. याकरिता वाशिम जिल्ह्याला १२ लक्ष ८४ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून त्यादृष्टीने वाशिम जिल्हा प्रशासनाने केलेल्या पूर्वतयारीचा आढावा आज विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी घेतला. याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात संबंधित विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, यवतमाळचे मुख्य वन संरक्षक पी. जी. राहुरकर, रोहयो उपायुक्त शहाजी पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अरुण राऊत, उप वन संरक्षक श्री. वळवी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय

‘उन्नत शेती, समृद्ध शेतकरी पंधरवडा’मध्ये आधुनिक कृषि तंत्रज्ञानाविषयी होणार जनजागृती

·       दि. २४ मे ते ७ जून या कालावधीत आयोजन ·       विविध विषयांवर शेतकऱ्यांना केले जाणार मार्गदर्शन वाशिम , दि . २१ : सन २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट शासनाने निश्चित केले आहे. या उद्दिष्टपूर्तीसाठी दि. २४ मे ते ७ जून २०१८ या रोहिणी नक्षत्राच्या कालावधीत जिल्ह्यात ‘उन्नत शेती, समृद्ध शेतकरी पंधरवडा’ राबविला जाणार आहे. याद्वारे आधुनिक कृषि तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविले जाणार आहे. प्रमुख पिकांकरिता आधुनिक आणि अद्ययावत कृषि तंत्रज्ञानाचा प्रसार करणे, शेतकऱ्यांसाठी शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजना, अभियान, उपक्रम यांची माहिती तसेच त्याचा लाभ घेण्यासाठी कार्यपद्धतीबाबत जनजागृती करणे, जमिनीची सुपीकता वाढीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन, बीज प्रक्रियेबाबत प्रात्यक्षिकांचे आयोजन, पिक विमा योजनेंतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सहभागी करून घेऊन नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या होणाऱ्या नुकसानीपासून पिकांना विमा संरक्षणाबाबत मार्गदर्शन करणे, प्रचलित योजनेचा लाभ न मिळणाऱ्या तसेच कृषि तंत्रज्ञानाच्या प्रात्यक्षिकांमध्ये सहभागी नसणाऱ्या शेतकऱ्यां