Posts

Showing posts from March, 2024

निवडणूक प्रक्रिया शांततेत व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याच्या दृष्टीने समन्वयाने काम करावे निवडणूक खर्च निरीक्षक प्रमोद वर्मा यांनी घेतला आढावा

Image
निवडणूक प्रक्रिया शांततेत व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याच्या दृष्टीने समन्वयाने काम करावे   निवडणूक खर्च निरीक्षक प्रमोद वर्मा यांनी घेतला आढावा   माध्यम कक्ष व नियंत्रण कक्षाला भेट                 वाशि‍म, दि.३० (जिमाका):  भारत निवडणूक आयोगामार्फत १४-यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय महसूल सेवेतील अधिकारी प्रमोद वर्मा यांची निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली असून आज त्यांनी वाशिम जिल्ह्यातील  खर्च विषयक कामांचा आढावा घेतला .यावेळी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, सहाय्यक जिल्हाधिकारी अपूर्वा बासूर, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, कारंजा उपविभागीय अधिकारी कैलास देवरे, वाशिम मंगरुळपीर उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राम लंके,अपर पोलीस अधीक्षक भारत तांगडे, जिल्हा कोषागार अधिकारी विजय जवंजाळ, जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण कोवे, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक अभिनव बालूरे उपस्थित होते.           श्री. वर्

महिला मतदारांनी मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस

Image
महिला मतदारांनी मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस "आम्ही आहोत महिला मतदार मतदानाचा हक्क अवश्य बजावणार" मतदान जनजागृती बाबत विद्यार्थिनींची प्रभात फेरी जिल्हाधिकारी यांनी महिला मतदारदारांशी साधला संवाद वाशिम,दि. २७ (जिमाका) महिला मतदारांनी मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेऊन आपल्या अधिकाराचा वापर करावा, आपण केलेले मतदान गोपनीय असते त्यामुळे कुठल्याही भीती किंवा आमिषाला बळी न पडता आपल्या अधिकाराचा योग्य वापर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एसट यांनी आज ०६-अकोला लोकसभा मतदार संघ अंतर्गत ३३ -रिसोड विधानसभा मतदारसंघातील रिसोड तालुक्याच्या मौजे रिठद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महिला मतदार जनजागृती मेळाव्यास मार्गदर्शन करताना केले. या मेळाव्यास रिसोड उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली देवकर, तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर, गटशिक्षणाधिकारी श्री. कोकाटे, मंडळ अधिकारी दिनकर केंद्रे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक भगवान खंडूजी बोरकर, नोडल अधिकारी श्रीन भिस्डे यांची प्रमुख उपस्थिती होती

२२ व २३ मार्च रोजी "वाशिम ग्रंथोत्सव

Image
वाशिम येथे दोन दिवसीय ग्रंथोत्सव        वाशिम, दि. २१ (जिमाका) : ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, वाशिम यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण २०१० अंतर्गत २२ व २३ मार्च २०२४ रोजी वाशिम ग्रंथोत्सवाचे आयोजन जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय वाशिम  येथे करण्यात आले आहे. या             ग्रंथोत्सवाचे उदघाटन सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक बाबाराव मुसळे हे असतील. प्रमुख अतिथी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे,जिल्हा पोलीस अधिक्षक अनुज तारे, सहाय्यक ग्रंथालय संचालक राजेश पाटील यांची उपस्थिती राहणार आहे. दुपारी २ ते ३ वाजेपर्यंत '' वाचन संस्कृती  वृद्धिंगत करण्यात समाजातील विविध घटकांची भूमिका '' या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.  दुपारी ३ ते  सायंकाळी ५ वाजेपर्यंत चेतन सेवांकुर, ऑर्केस्ट्रा, केकतउमरा हे कार्यक्रम सादर करतील.            २३  मार्च रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.           दुप

जिल्हा न्यायालयात मध्यस्थी जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

Image
जिल्हा न्यायालयात मध्यस्थी जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न वाशिम,दि.१९ (जिमाका) :जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधीज्ञ संघ वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालयामध्ये मध्यस्थी संबधी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.       कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा व सत्र न्यायाधीश, वाशिम तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष न्या . एस.व्ही. हांडे, जिल्हा न्यायाधीश -१ एन.आर.प्रधान, जिल्हा विधीज्ञ संघाचे अध्यक्ष अनुप बाकलीवाल, सरकारी अभियोक्ता अभिजीत व्यवहारे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव‌ विजय टेकवाणी यांची प्रमुख उपस्थिती होती.       अध्यक्षस्थानावरून बोलतांना श्री.हांडे यांनी उपस्थितांना मध्यस्थी बाबत महत्वपुर्ण मार्गदर्शन केले. दिवाणी न्यायाधीश (व.स्तर) आर.पी. कुलकर्णी यांनी व्यावसायिक विवादात दाखलपूर्व मध्यस्थी आणि त्याची प्रक्रिया या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. तर अॅड. एस. एन. काळु यांनी मध्यस्थी आणि त्याचे महत्व याबाबत मार्गदर्शन केले.       कार्यक्रमाचे संचालन कु. पल्लवी अनंता घुगे यांनी तर आभार कु. पुजा संतोष वानखडे या

लोकसभा निवडणुकीसाठी यंत्रणांनी सज्ज राहावे जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस

Image
लोकसभा निवडणुकीसाठी यंत्रणांनी सज्ज राहावे जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस वाशिम (जिमाका) : लोकसभा निवडणुकांबाबत भारत निवडणूक आयोगाने कडक निर्देश दिले असून स्पष्ट मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यामुळे यंदाची लोकसभा निवडणूक गांभीर्याने घ्यावी व यंत्रणांनी सज्ज राहून समन्वयाने काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी अधिकाऱ्यांना दिले. आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था तसेच आदर्श आचार संहिता अनुपालनाविषयी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी दि.१४ मार्च रोजी पूर्वतयारीचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात ही बैठक पार पडली. त्यावेळी त्या बोलत होत्या.  या बैठकीला पोलीस अधीक्षक अनुज तारे, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कैलास देवरे, वैशाली देवकर यांच्यासह विविध विभागाचे नोडल अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या बैठकीत इलेक्टोरल बॅान्ड, दारु प्रतिबंध, परवानाधारक शस्त्र प्रतिबंध, असुरक्षित व गंभीर मतदान केंद्रांवरील सुरक्षा, जप्ती प्रक्रिया, सीव्हिजिल ॲप,भरारी पथके, स्थिर संनिरीक्षण चमू,

लोकसभा निवडणुकीतील खर्चाविषयी अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण**निवडणूक कामात हयगय होता कामा नये*जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस

Image
लोकसभा निवडणुकीतील खर्चाविषयी अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण निवडणूक कामात हयगय होता कामा नये जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस वाशिम (जिमाका) : यंदाची लोकसभा सार्वत्रिक निवडणूक महत्त्वाची आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निवडणूक विषयक नेमून दिलेल्या कामात हयगय होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी दिले.  आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने खर्च विषयकबाबीसंबंधी कार्यवाहीसाठी नियुक्त खर्च विषयक पथक प्रमुख, त्यांचे सहायक, सर्व सहायक खर्च निरीक्षक, मतदार संघानिहाय नियुक्त विविध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना गुरुवारी प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळी मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस पुढे म्हणाल्या, लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने स्पष्ट निर्देश दिले आहे. त्याबाबत संबंधितांना प्रशिक्षण दिले जात आहे. निवडणूक विषयक नियमांचा अभ्यास करावा. जेणेकरुन निवडणूक काळात चूका होणार नाही. प्रशिक्षणाचा फायदा फिल्डवर दिसला पाहिजे. नियमाच्या बाहेर कोणतेही काम होणार नाही याची दक्षता घ्यावी. अधिकार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम-सुरज पोर्टलचे लोकार्पण*पीएम योजनांच्या लाभार्थी संवाद कार्यक्रमात वाशिमचे लाभार्थी सहभागी

Image
*प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम-सुरज पोर्टलचे लोकार्पण* पीएम योजनांच्या लाभार्थी संवाद कार्यक्रमात वाशिमचे लाभार्थी सहभागी             वाशिम, (जिमाका): देशातील वंचित व मागासवर्गातील जनतेच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या पीएम-सूरज पोर्टलचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे लोकार्पण करण्यात आले. यावेळी प्रधानमंत्री यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधला. या संवाद कार्यक्रमात वाशिम जिल्ह्यातील लाभार्थी सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित या संवाद व पोर्टल लोकार्पण कार्यक्रमास जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस, समाज कल्याण सहायक आयुक्त मारुती वाठ, एसबीआयचे व्यवस्थापक दिलीप मोहपात्रा, महात्मा फुले विकास महामंडळाचे व्यवस्थापक सुरेंद्र यावलीकर, समाज कल्याण निरीक्षक राहुल शिरभाते, नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक शंकर कोकडवार, दिपा हिरोळे आणि जिल्ह्यातील लाभार्थी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे मोठ्या संख्येने उपस्थित होते.             प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले की, पीएम-सूर

अबला नव्हे; स्वतःला ‘सबला’ समजा -जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस

Image
अबला नव्हे; स्वतःला ‘सबला’ समजा  -जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस > जिल्हाधिकारी कार्यालयात महिलांसाठी जनजागृतीपर कार्यक्रम उत्साहात  > २६ महिलांचा सत्कार वाशिम ,(जिमाका) : आपल्या कामाचे मूल्यमापन कोणी तरी करेल, ही अपेक्षा ठेवू नका. स्वतःला ‘अबला’ समजणे बंद करा आणि स्वतःला ‘सबला’ समजा, असे आवाहन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी आज केले. जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात महिलांसाठी जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा नियोजन भवनातील सभागृहात करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, सहाय्यक जिल्हाधिकारी अपूर्वा बासूर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, जिल्हा माहिला व बाल विकास अधिकारी प्रियंका गवळी, माविमचे जिल्हा समन्वयक राजेश नागपूरे, रिसोड तहसीलदार प्रतिक्षा तेजणकर आदी मान्यवर उपस्थित होते.  प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमास सुरुवात झाली.  जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस पूढे म्

जागतिक महिला दिनी नागठाणा येथे ’क्षेत्रीय किसान गोष्टी’ कार्यक्रम

Image
*जागतिक महिला दिनी नागठाणा येथे ’क्षेत्रीय किसान गोष्टी’ कार्यक्रम* वाशिम (जिमाका) : जागतिक महिला दिनानिमित्त कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा,आत्माअंतर्गत नागठाणा येथे ’क्षेत्रीय किसान गोष्टी’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात आत्माच्या प्रकल्प संचालक अनिसा महाबळे यांनी महिलांना कृषीविषयक शासनाच्या योजना, उपक्रमांची माहिती दिली.  यावेळी तालुका कृषी अधिकारी अतुल जावळे,  पंचायत समिती सदस्य द्रौपदी सोळंके, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जयप्रकाश लव्हाळे, कृषी सहाय्यक महादेव सोळंके, बाळू इंगळे,राजू ठाकरे, तालुका कृषी अधिकारी वाशिम कार्यालयातील सर्व महिला कर्मचारी कृतिका नागमोथे, रेणूका काकडे तसेच नागठाणा येथील महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. ०००

उपवासाला भगरीचे सेवन करतांना दक्षता घ्याजिल्हा प्रशासनाचे आवाहन> भगरीच्या अतिसेवनाने होऊ शकते विषबाधा

Image
उपवासाला भगरीचे सेवन करतांना दक्षता घ्या जिल्हा प्रशासनाचे आवाहन > भगरीच्या अतिसेवनाने होऊ शकते विषबाधा वाशिम (जिमाका) : उपवासाला मोठ्या प्रमाणात भगरीचे सेवन केले जाते भगर खाल्ल्यामुळे अन्न विषबाधा झाल्याच्या अनेक घटना महाराष्ट्रात व वाशिम जिल्ह्यात घडत आहेत. त्यामुळे नागरिकांनी उपवासाला भगर खाताना दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे 'भगरीवर मोठ्या प्रमाणात अस्परजिलस प्रजातीच्या बुरशीचा प्रादुर्भाव होतो. ज्यामुळे फ्युमिगाफ्लेविन यासारखी विषद्रव्ये तयार होतात. ऑक्टोबर महिन्यातील तापमान आणि आर्द्रता बुरशीच्या वाढीसाठी अनुकूल असते. अशी बुरशीचा प्रादुर्भाव झालेली भगर खाण्यात आल्यास अन्न विषबाधा होऊ शकते. त्यामुळे भगर खाताना काळजी घ्यावी. *काय काळजी घ्याल :* बाजारातून भगर आणल्यानंतर ती निवडून स्वच्छ करा. शक्यतोवर पाकीटबंद भगर घ्या. ब्रॅंड नाव नसलेली किंवा लेबल नसलेली भगर पाकीटे व सूटी भगर घेऊ नका, भगर घेतांना पाकीटावरचा पॅकींग दिनांक व अंतिम वापर दिनांक तपासावे. भगर साठवताना ती स्वच्छ कोरड्या ठिकाणी व्यवस्थित झाकणबंद डब्यात ठेवा. जेणेकरून वातावरणातील ओलाव्याम

#वाशिमचा #organic फ्रेश संत्रा ठाणेकरांसाठी रास्त दरात उपलब्ध..

Image
📍ठाणे #वाशिम चा #organic फ्रेश संत्रा ठाणेकरांसाठी रास्त दरात उपलब्ध.. दि. १० मार्च रोजी स्थळ - वसंत विहार को-ॲापरेटिव्ह हाउसिंग अॅपेक्स फेडरेशन, ठाणे (प)

#वाशिम चा फ्रेश सेंद्रिय संत्रा पुणेकरांसाठी रास्त दरात उपलब्ध..

Image
📍पुणे #वाशिम चा फ्रेश सेंद्रिय संत्रा पुणेकरांसाठी रास्त दरात उपलब्ध.. #organicorange दि. १० मार्च रोजी  स्थळ : स्वप्नशिल्प को-ॲापरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी कोथरुड, पुणे  करिष्मा को-ॲापरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी कोथरुड, पुणे

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न करा-डॅा. पंकज आशिया

Image
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न करा -डॅा. पंकज आशिया निवडणूक निर्णय अधिकारी डॅा. आशिया यांनी घेतला वाशिम, कारंजा मतदारसंघातील पूर्वतयारीचा आढावा वाशिम (जिमाका) : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघांतर्गत कारंजा आणि वाशिम विधानसभा मतदारसंघातील निवडणूक पूर्वतयारीचा आढावा यवतमाळचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॅा. पंकज आशिया यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला. यावेळी मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश त्यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील राजे वाकाटक सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी डॅा. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या आढावा सभेत आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वाशिम आणि कारंजा विधानसभा मतदारसंघातील निवडणूकविषयक सर्व बाबींचा आढावा घेण्यात आला. यावेळी वाशिमच्या जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस, उप जिल्हा निवडणूक अधिकारी राम लंके, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, वाशिम व कारंजाचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, ठाणेदार, नायब तहसीलदार आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या आढावा बैठकीत निवडणूक निर्णय अधिकारी डॅा.

महाशिवरात्रीला उपवास आहे ? मग शेतकऱ्यांनी पिकवलेला फ्रेश संत्रा घ्या स्वस्त दरात> बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण व शेतमाल विक्री केंद्रावर उपलब्ध> ७ मार्च रोजी संत्रा विक्रीला सुरुवात

Image
महाशिवरात्रीला उपवास आहे ?  मग शेतकऱ्यांनी पिकवलेला फ्रेश संत्रा घ्या स्वस्त दरात* > बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण व शेतमाल विक्री केंद्रावर उपलब्ध > ७ मार्च रोजी संत्रा विक्रीला सुरुवात वाशिम (जिमाका) : महाशिवरात्रीला उपवास करण्याची परंपरा पूर्वापार सुरु आहे. अनेकजण उपवासात फराळाच्या खाद्यपदार्थांना पसंती दर्शवतात. यंदाच्या महाशिवरात्रीनिमित्त ७ मार्च रोजी जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी पिकवलेला फ्रेश संत्रा वाशिमकरांसाठी स्वस्त दरात उपलब्ध होणार आहे.  नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण झालेल्या स्व.बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण व शेतमाल विक्री केंद्रावर शेतकऱ्यांनी पिकवलेला शेतमाल थेट विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. ‘शेतकरी ते ग्राहक’ या संकल्पनेतून जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांच्या मार्गदर्शनाखाली ही सुविधा वाशिमकरांसाठी सुरु करण्यात येणार आहे.  जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पिकवलेला शेतमाल विक्रीसाठी शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ मिळावी या उद्देशाने जिल्हा प्रशासन आणि  ‘आत्मा’ मार्फत शेतमाल विक्री केंद

लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा*जिल्हास्तरीय नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक

Image
*लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा* > जिल्हास्तरीय नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक  वाशिम (जिमाका) : वाशिम जिल्ह्यातील रिसोड, वाशिम आणि कारंजा मतदारसंघात होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी बुवनेश्वरी एस यांनी जिल्हास्तरीय नोडल अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आदींची बैठक घेऊन निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात झालेल्या या आढावा सभेस उप जिल्हा निवडणूक अधिकारी राम लंके, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, रिसोडच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली देवकर, वाशिमचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र जाधव, कारंजाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे तसेच सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.  वाशिम जिल्ह्यातील आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक विषयक कामकाज सुरळितपणे पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांच्या आदेशाने नोडल अधिकारी व कर्मचारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यात मुख्य नियंत्रण कक्ष, वाहतूक व्यवस्थापन, आदर्श आचार

वाशिम येथे जिल्हास्तरीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे उद्घाटन

Image
वाशिम येथे जिल्हास्तरीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे उद्घाटन वाशिम (जिमाका) :  जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे उद्घाटन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस व मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांचे हस्ते लहान बालकांना पोलिओचा डोस देवून करण्यात आले.  याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुहास कोरे व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अनिल कावरखे यांनी जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या पल्स पोलिओ मोहिमेबद्दल सविस्तर माहिती दिली. जिल्ह्यामध्ये सर्व बूथद्वारे १ लाख 28 हजार 296 बालकांना जवळच्या शाळा अंगणवाडी केंद्र, सर्व शासकीय दवाखाने इत्यादी ठिकाणी पोलिओ लस देण्यात येणार आहे. तसेच दिनांक ४ ते ९ मार्च दरम्यान शहरी भागात व दिनांक ४ ते ६ मार्च दरम्यान ग्रामीण भागात पोलिओ लस घेण्यापासून वंचित राहिलेल्या बालकांना घरोघरी जाऊन डोस पाजण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सांगितले.  याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी जिल्ह्यात प्रभावीपणे राबवल्या जात असलेल्या मोहिमेबद्दल आरोग्य यंत्रणेचे अभिनंदन केले. तसेच मोहिमेची व्यापक प्रसिद

राष्ट्रीय लोक अदालतीत एकाच दिवशी १०६७ प्रकरणे निकाली

Image
राष्ट्रीय लोक अदालतीत एकाच दिवशी १०६७ प्रकरणे निकाली  वाशिम , (जिमाका) राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली व मा. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांनी दिलेल्या निर्देशानुसार रविवार ३ मार्च, २०२४ रोजी जिल्हयातील सर्व तालुका तसेच जिल्हा न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.   जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष  तथा प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश वाशिम एस. व्ही. हांडे , जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव‌ तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर वाशिम व्ही. ए. टेकवाणी यांनी ज्या पक्षकारांचे प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत तसेच दाखल पुर्व प्रकरणे असलेल्या पक्षकारांनी आपले वाद सामोपचाराने कायमचे मिटविण्याकरीता लोक न्यायालयामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले होते. राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये एका दिवसात जिल्ह्यातील न्यायालयात प्रलंबित असलेल्या एकुण १ हजार २ प्रकरणांचा तसेच दाखलपुर्व ६५ प्रकरणे असे एकुण १ हजार ६७ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला असून व एकुण रुपये ४ कोटी ५२ लक्ष ११ हजार ५२८ रकमेची  प्रकरणे निकाली काढण्यात आली. राष्ट्रीय लोक अदाल

जिल्हा न्यायालयात मराठी भाषा संवर्धन दिन उत्साहात

Image
जिल्हा न्यायालयात मराठी भाषा संवर्धन दिन उत्साहात वाशिम, (जिमाका) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधिज्ञ संघ, यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालय, वाशिम येथे मराठी भाषा संवर्धन दिन उत्साहात पार पडला.  कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. हांडे  यांची उपस्थिती लाभली. त्यांनी उपस्थितांना मराठी भाषा संवर्धन दिनाचे अनुषंगाने महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. यावेळी तदर्थ जिल्हा न्यायाधीश व्ही. व्ही. नाशिककर व जिल्हा विधिज्ञ संघाचे अध्यक्ष अॅड. अनुप बाकलीवाल तसेच सरकारी अभियोक्ता अभिजीत व्यवहारे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कवी डॉ. विजय काळे यांनी मराठी भाषा संवर्धन दिनाचे अनुषंगाने उपस्थितांना स्वरचीत कविता ऐकवून मराठी भाषा संवर्धन दिनाबाबत माहिती सांगितली. तसेच लेखक प्रा.  गजानन वाघ यांनी मराठी भाषा संवर्धन दिनाचे अनुषंगाने उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक मुख्य लोक अभिरक्षक अॅड.परमेश्वर शेळके यांनी केले तर श्रीमती बारड यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमासाठी जिल्हा मुख्यालयातील सर्व न्यायीक अध

वाशिमचा सेंद्रिय रथ मुंबईला रवाना ; मुख्यमंत्र्यांनी दाखवली हिरवी झेंडी

Image
वाशिमचा सेंद्रिय रथ मुंबईला रवाना ; मुख्यमंत्र्यांनी दाखवली हिरवी झेंडी  वाशिम (जिमाका) : मुंबई येथे आयोजित सेंद्रिय उत्पादनांच्या विक्री स्टॅालसाठी वाशिम येथील कृषी विभागाचा सेंद्रिय रथ मुंबईला रवाना झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या सेंद्रिय रथाला हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले.  आत्माच्या स्व.बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण व शेतमाल विक्री केंद्राच्या लोकार्पण सोहळ्यादरम्यान हा सेंद्रिय रथ रवाना करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.  यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, खासदार भावना गवळी, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.  मुंबईतील मंत्रालयाच्या मुख्य इमारतीतील त्रिमूर्ती प्रांगण येथे सेंद्रिय उत्पादनांचे विक्री स्टॉल उभारण्यात येत आहे. त्यासाठी वाशिमचा सेंद्रिय रथ रवाना करण्यात आला आहे.  ०००

अनेक वर्षांची मागणी पूर्ण; वाशिमकरांमध्ये उत्साह_छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

Image
अनेक वर्षांची मागणी पूर्ण; वाशिमकरांमध्ये उत्साह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण वाशिम, दि. ४ : वाशिम नगरपरिषदेमार्फत उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले. अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाल्याने वाशिमकरांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. छत्रपती शिवरायांच्या जयजयकाराने आसमंत निनादून गेले होते. सोहळ्याला संभाजीराजे छत्रपती, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, खासदार भावना गवळी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आमदार ऍड. किरण सरनाईक, माजी मंत्री महादेवराव जानकर, गोपीकिशन बाजोरिया, विभागीय आयुक्त डॅा. निधी पाण्डेय, जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, पोलीस अधीक्षक अनुज तारे, सहायक जिल्हाधिकारी अपूर्वा बासुर आदी सोहळ्याला उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळकरी विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्याद्वारे मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि मान्यवरांचे स्वागत के

वाशिम येथे स्व. बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण व शेतमाल विक्री केंद्राचे लोकार्पण

Image
_*वाशिम येथे स्व. बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण व शेतमाल विक्री केंद्राचे लोकार्पण*_ *शेतीमालाचे मूल्यवर्धन आणि विपणनासाठी प्रशिक्षण व विक्री केंद्र उपयुक्त ठरेल* - *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे* वाशिम, दि. 4 :  शेतकरी बांधवांच्या उन्नतीसाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्नशील असून, अनेक योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण व शेतमाल विक्री केंद्र स्थानिक शेतीमालाचे विपणन व मूल्यवर्धनासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला.    वाशिम येथे स्व. बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण व शेतमाल विक्री केंद्राचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, खासदार भावना गवळी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आमदार ॲड. किरण सरनाईक, महादेवराव जानकर, गोपीकिशन बाजोरिया, जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस., पोलीस अधिक्षक अनुज तारे, सहायक जिल्हाधिकारी अपूर्वा बासुर, कृषी सहसंचालक किसन मुळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी आरिफ शाह, 'आत्मा'च्या प्रकल्प संच

जिल्हाधिकाऱ्यांकडून रिसोड विधानसभा मतदारसंघ निवडणूक पूर्वतयारीचा आढावाअकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी घेतली वाशिममध्ये बैठक

Image
जिल्हाधिकाऱ्यांकडून रिसोड विधानसभा मतदारसंघ निवडणूक पूर्वतयारीचा आढावा अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी घेतली वाशिममध्ये बैठक वाशिम (जिमाका) : अकोला लोकसभा मतदारसंघांतर्गत रिसोड विधानसभा मतदारसंघ निवडणूक पूर्वतयारीचा आढावा अकोला जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार यांनी आज वाशिम येथे घेतला.  जिल्हाधिकारी कार्यालयातील राजे वाकाटक सभागृहात अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या आढावा सभेत आगामी अकोला लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने 33 रिसोड मतदार संघातील मालेगाव व रिसोड तालुक्यातील सर्व माहितीचा व निवडणूकविषयक सर्व बाबींचा आढावा घेण्यात आला. यावेळी अकोलाचे उप जिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर, वाशिमच्या उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, तहसीलदार रिसोड प्रतीक्षा तेजनकर, मालेगावचे तहसीलदार दीपक पुंडे, नायब तहसीलदार सुनील देशमुख, रिसोड नायब तहसिलदार विद्या जगाडे, निवासी उपजिल्हाधिकारी यांचे स्विय सहाय्यक सुनील कराले, महसूल सहाय्यक गजानन देशमुख, महसूल सहाय्यक संदीप काळबांडे, रिसोड मालेगाव येथील ऑपरेटर विष्णू टोंचर, राजेश शर्मा