जिल्हा न्यायालयात मध्यस्थी जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न


जिल्हा न्यायालयात मध्यस्थी जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

वाशिम,दि.१९ (जिमाका) :जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधीज्ञ संघ वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालयामध्ये मध्यस्थी संबधी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन
करण्यात आले.
      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा व सत्र न्यायाधीश, वाशिम तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष न्या . एस.व्ही. हांडे, जिल्हा न्यायाधीश -१ एन.आर.प्रधान, जिल्हा विधीज्ञ संघाचे अध्यक्ष अनुप बाकलीवाल, सरकारी अभियोक्ता अभिजीत व्यवहारे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव‌ विजय टेकवाणी यांची प्रमुख उपस्थिती होती. 
     अध्यक्षस्थानावरून बोलतांना श्री.हांडे यांनी उपस्थितांना
मध्यस्थी बाबत महत्वपुर्ण मार्गदर्शन केले. दिवाणी न्यायाधीश (व.स्तर) आर.पी. कुलकर्णी यांनी व्यावसायिक विवादात दाखलपूर्व मध्यस्थी आणि त्याची प्रक्रिया या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. तर अॅड. एस. एन. काळु यांनी मध्यस्थी आणि त्याचे महत्व याबाबत मार्गदर्शन केले. 
     कार्यक्रमाचे संचालन कु. पल्लवी
अनंता घुगे यांनी तर आभार कु. पुजा संतोष वानखडे यांनी मानले.
      कार्यक्रमाला वाशिम जिल्हा न्यायालयातील न्यायीक अधिकारी,
सरकारी अभियोक्ता, विधिज्ञ मंडळ सदस्य, लोक अभिरक्षक, न्यायीक
कर्मचारी, जिल्हा विधि सेवा प्राधिकरणचे कर्मचारी, पक्षकार मोठ्या संख्येनेउपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे