राष्ट्रीय लोक अदालतीत एकाच दिवशी १०६७ प्रकरणे निकाली

राष्ट्रीय लोक अदालतीत
एकाच दिवशी १०६७ प्रकरणे निकाली 

वाशिम , (जिमाका) राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली व मा. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांनी दिलेल्या निर्देशानुसार रविवार ३ मार्च,
२०२४ रोजी जिल्हयातील सर्व तालुका तसेच जिल्हा न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. 

 जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष  तथा प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश वाशिम एस. व्ही. हांडे , जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव‌ तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर वाशिम व्ही. ए. टेकवाणी यांनी ज्या पक्षकारांचे प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत तसेच दाखल पुर्व प्रकरणे असलेल्या पक्षकारांनी आपले वाद सामोपचाराने कायमचे मिटविण्याकरीता लोक न्यायालयामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले होते.

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये एका दिवसात जिल्ह्यातील न्यायालयात प्रलंबित असलेल्या एकुण १ हजार २ प्रकरणांचा तसेच दाखलपुर्व ६५ प्रकरणे असे एकुण १ हजार ६७
प्रकरणांचा निपटारा करण्यात आला असून व एकुण रुपये ४ कोटी ५२ लक्ष ११ हजार ५२८ रकमेची 
प्रकरणे निकाली काढण्यात आली.

राष्ट्रीय लोक अदालत यशस्वी होण्यामध्ये वकील संघाचे व जिल्हा पोलीस दलाचे सहकार्य मिळाले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे