महाशिवरात्रीला उपवास आहे ? मग शेतकऱ्यांनी पिकवलेला फ्रेश संत्रा घ्या स्वस्त दरात> बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण व शेतमाल विक्री केंद्रावर उपलब्ध> ७ मार्च रोजी संत्रा विक्रीला सुरुवात


महाशिवरात्रीला उपवास आहे ?

 मग शेतकऱ्यांनी पिकवलेला फ्रेश संत्रा घ्या स्वस्त दरात*

> बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण व शेतमाल विक्री केंद्रावर उपलब्ध
> ७ मार्च रोजी संत्रा विक्रीला सुरुवात

वाशिम (जिमाका) : महाशिवरात्रीला उपवास करण्याची परंपरा पूर्वापार सुरु आहे. अनेकजण उपवासात फराळाच्या खाद्यपदार्थांना पसंती दर्शवतात. यंदाच्या महाशिवरात्रीनिमित्त ७ मार्च रोजी जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी पिकवलेला फ्रेश संत्रा वाशिमकरांसाठी स्वस्त दरात उपलब्ध होणार आहे. 

नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण झालेल्या स्व.बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण व शेतमाल विक्री केंद्रावर शेतकऱ्यांनी पिकवलेला शेतमाल थेट विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. ‘शेतकरी ते ग्राहक’ या संकल्पनेतून जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांच्या मार्गदर्शनाखाली ही सुविधा वाशिमकरांसाठी सुरु करण्यात येणार आहे. 

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पिकवलेला शेतमाल विक्रीसाठी शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ मिळावी या उद्देशाने जिल्हा प्रशासन आणि  ‘आत्मा’ मार्फत शेतमाल विक्री केंद्राची निर्मित करण्यात आली आहे. वाशिम शहरातील काटा-कोंडाळा रोड येथील या शेतमाल विक्री केंद्रावर शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांसाठी शेतकऱ्यांनी पिकविलेले सेंद्रिय धान्य, फळे, भाजीपाला विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

महाशिवरात्रीनिमित्त वाशिम जिल्ह्यातील फ्रेश संत्रा फळांची रास्त दरात ‘शेतकरी ते ग्राहक’ थेट विक्री या ठिकाणी होणार आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी याचा आवर्जून लाभ घ्यावा व शेतकऱ्यांच्या मालाला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने आत्माच्या प्रकल्प संचालक अनिसा महाबळे यांनी केले आहे.
०००

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे