२२ व २३ मार्च रोजी "वाशिम ग्रंथोत्सव


वाशिम येथे दोन दिवसीय ग्रंथोत्सव


       वाशिम, दि. २१ (जिमाका) : ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, वाशिम यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण २०१० अंतर्गत २२ व २३ मार्च २०२४ रोजी वाशिम ग्रंथोत्सवाचे आयोजन जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय वाशिम  येथे करण्यात आले आहे. या 

           ग्रंथोत्सवाचे उदघाटन सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक बाबाराव मुसळे हे असतील. प्रमुख अतिथी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे,जिल्हा पोलीस अधिक्षक अनुज तारे, सहाय्यक ग्रंथालय संचालक राजेश पाटील यांची उपस्थिती राहणार आहे. दुपारी २ ते ३ वाजेपर्यंत '' वाचन संस्कृती  वृद्धिंगत करण्यात समाजातील विविध घटकांची भूमिका '' या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.  दुपारी ३ ते  सायंकाळी ५ वाजेपर्यंत चेतन सेवांकुर, ऑर्केस्ट्रा, केकतउमरा हे कार्यक्रम सादर करतील.

           २३  मार्च रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
          दुपारी ४.३० वाजता समारोप होणार आहे. या समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपस्थित राहणार असून  या दोन दिवशीय ग्रंथोत्सवाचा लाभ जिल्हयातील वाचक, साहित्यीक, कवी व नागरीकांनी घ्यावा. असे आवाहन ग्रंथोत्सव जिल्हा समन्वय समितीतर्फे करण्यात आले आहे.     

*******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे