वाशिमचा सेंद्रिय रथ मुंबईला रवाना ; मुख्यमंत्र्यांनी दाखवली हिरवी झेंडी
- Get link
- X
- Other Apps
वाशिमचा सेंद्रिय रथ मुंबईला रवाना ; मुख्यमंत्र्यांनी दाखवली हिरवी झेंडी
वाशिम (जिमाका) : मुंबई येथे आयोजित सेंद्रिय उत्पादनांच्या विक्री स्टॅालसाठी वाशिम येथील कृषी विभागाचा सेंद्रिय रथ मुंबईला रवाना झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या सेंद्रिय रथाला हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले.
आत्माच्या स्व.बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण व शेतमाल विक्री केंद्राच्या लोकार्पण सोहळ्यादरम्यान हा सेंद्रिय रथ रवाना करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, खासदार भावना गवळी, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. मुंबईतील मंत्रालयाच्या मुख्य इमारतीतील त्रिमूर्ती प्रांगण येथे सेंद्रिय उत्पादनांचे विक्री स्टॉल उभारण्यात येत आहे. त्यासाठी वाशिमचा सेंद्रिय रथ रवाना करण्यात आला आहे. ०००
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment