वाशिम येथे जिल्हास्तरीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे उद्घाटन

वाशिम येथे जिल्हास्तरीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे उद्घाटन

वाशिम (जिमाका) :  जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे उद्घाटन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस व मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांचे हस्ते लहान बालकांना पोलिओचा डोस देवून करण्यात आले.

 याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुहास कोरे व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अनिल कावरखे यांनी जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या पल्स पोलिओ मोहिमेबद्दल सविस्तर माहिती दिली. जिल्ह्यामध्ये सर्व बूथद्वारे १ लाख 28 हजार 296 बालकांना जवळच्या शाळा अंगणवाडी केंद्र, सर्व शासकीय दवाखाने इत्यादी ठिकाणी पोलिओ लस देण्यात येणार आहे. तसेच दिनांक ४ ते ९ मार्च दरम्यान शहरी भागात व दिनांक ४ ते ६ मार्च दरम्यान ग्रामीण भागात पोलिओ लस घेण्यापासून वंचित राहिलेल्या बालकांना घरोघरी जाऊन डोस पाजण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सांगितले. 

याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी जिल्ह्यात प्रभावीपणे राबवल्या जात असलेल्या मोहिमेबद्दल आरोग्य यंत्रणेचे अभिनंदन केले. तसेच मोहिमेची व्यापक प्रसिद्धी व जनजागृती आरोग्य यंत्रणेने केल्याने मोहीम नक्कीच यशस्वी होईल, असा आशावाद व्यक्त केला. याप्रसंगी आरोग्य अधिकारी कर्मचारी व नागरिकांची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे